तुम्हीही One Plus वापरताय? युझरच्या खिशात बॅटरीचा स्फोट

तुम्हीही One Plus वापरताय?  युझरच्या खिशात बॅटरीचा स्फोट

तुम्हीही One Plus वापरताय? युझरच्या खिशात बॅटरीचा स्फोट

वनस्लस फोन स्मॉर्टफोन हा सध्या भारतात सर्वाधिक विकला जाणारा प्रसिद्ध फोन आहे. मात्र या फोनमुळे होणारे अपघातही दिवसेंदिवस वाढत जात आहेत. नुकताच वन प्लस नॉर्ड २ 5G हा फोन बाजारात आला आहे आणि हा फोन बाजारात आल्यापासून त्याचा तिसऱ्यांदा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. सुहित शर्मा नावाच्या एका युझरने वन प्लस नॉर्ड २ 5G फोनच्या बॅटरीचा खिशात स्फोट झाल्याचे फोटो ट्विट केले आहेत. या अपघातात फोन वापरणाऱ्या युझरच्या मांडीला गंभीररित्या भाजले आहे. सुहित शर्मा यांनी स्फोटाचे चार फोटो ट्विट केले आहेत ज्यात वन प्लस फोनचा एका बाजूने स्फोट झाला आहे. तर दुसऱ्या फोटोत फोन पॅटमध्ये असताना कसा फुटला याचा फोटो आहे तर तिसऱ्या फोटोत युझर्सच्या मांडीला झालेली गंभीर दुखापत दिसत आहे.

सुहित शर्मा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कंपनीकडून हे कधीच अपेक्षित नव्हते. तुमच्या प्रोडक्टने काय केले पहा. आता या परिणामांना समोरे जाण्याची तयारी ठेवा आणि लोकांच्या जिवाशी खेळणे बंद करा. तुमच्यामुळे माझ्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्याशी लवकरात लवकर संपर्क साधा.’

सुहित यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. एका युझरने सुहित यांच्या ट्विटला रिप्लाय देत ‘वन प्लस नॉर्ड २ 5G फोनचा स्फोट होण्याची ही तिसरी घटना असून हे अत्यंत भितीदायक आहे. मी आधीही सांगितले होते या कंपनीचे प्रोडक्ट घेणे टाळा’, असे म्हटले आहे.  सुहित यानी दिलेल्या माहितीनंतर अनेकांनी वन प्लस नॉर्ड २ 5G फोनची केलेली ऑर्डर कॅन्सल केली आहे.


वन प्लस या कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने म्हटले आहे की, आम्ही या घटनांकडे गांभीर्याने पाहत आहोत. आमची टीम पिडीताच्या संपर्कात आहे. आम्ही अशा घटनांची माहिती गोळा करत आहोत जेणेकरुन पुढे असे प्रकार झाल्यास कारवाई करता येईल.


हेही वाचा – What’s App Statusवरचे व्हिडिओ कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सोपी ट्रिक

 

 

First Published on: November 9, 2021 8:28 PM
Exit mobile version