घरटेक-वेकWhat's App Statusवरचे व्हिडिओ कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सोपी ट्रिक

What’s App Statusवरचे व्हिडिओ कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सोपी ट्रिक

Subscribe

२०१७नंतर व्हॉट्स अँपचा चेहरा मोहराच बदलला. व्हॉट्स अँप म्हटलं की व्हॉट्स अँप स्टेटस हे नवीन समीकरण सुरू झाले.

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे महत्त्वाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे व्हॉट्स अँप. व्हॉट्स अँप हा आपल्या जिवनाचा एक भाग झाला आहे. 2009मध्ये व्हॉट्स अँप लाँच झाले. व्हॉट्स वापरात आल्यापासून त्यात अनेक बदल झालेत. सुरुवातील केवळ चॅटिंग, ग्रुप चॅटिंग अशी व्हॉट्स अँपची मर्यादा होती. मात्र २०१७नंतर व्हॉट्स अँपचा चेहरा मोहराच बदलला. व्हॉट्स अँप म्हटलं की व्हॉट्स अँप स्टेटस हे नवीन समीकरण सुरू झाले. आपल्या स्टेटसवर केवळ टेक्स किंवा फोटोसह व्हिडिओ देखील टाकण्याचा पर्याय उपलब्ध झाला. आपलं आवडत गाणं व्हॉट्स अँप स्टेटसवर पोस्ट करण्याची पद्धत सुरू झाली. अनेकदा आपल्याला दुसऱ्याच्या स्टेटसवरची गाणी आवडतात. मात्र ती आपल्याला डाऊनलोड करता येत नाहीत. समोरच्या व्यक्तीकडे गाणे मागणे देखील बरे वाटत नाही. मग अशावेळी काय करायचे. मात्र एका थर्डपार्टी अँपचा वापर करुन तुम्ही दुसऱ्यांचे व्हॉट्स अँप स्टेटस व्हिडिओ डाऊनलोड करू शकता. स्टेटस व्हिडिओ कसे डाऊनलोड करायचे जाणून घ्या.

  • स्ले स्टोअरवर आपल्याला अनेक थर्ड पार्टी अँप पहायला मिळतात. त्यातील Google Files हे अँप वापरुन स्टेटसवरील व्हिडिओ डाऊनलोड करू शकतो.
  • पहिल्यांदा Google Play Store वर जाऊनGoogle Files हे अँप डाऊनलोड करा.
  • अँप डाऊनलोड झाल्यानंतर मेन्यू या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन Show Hidden Files या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे फाइल मॅनेजरमध्ये जाऊन इंटरनल स्टोरेजचा पर्याय निवडा. त्यातील व्हॉट्स अँप हा पर्याय निवडून Status वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या व्हॉट्स अँपवरील सर्व स्टेटस या फोल्डरमध्ये दिसतील. तुम्हाला हवे असलेले स्टेटस तुम्ही कॉपी करू शकता.
  • तुमच्या फोनमध्ये एक फोल्डर तयार करुन तुम्हाला हवा असलेला स्टेटस तुम्ही सेव्ह करू शकता.

व्हॉट्स अँप स्टेटसवर दुसऱ्या व्यक्तीने स्टेटसवर टाकलेला कोणताही फोटो आपण स्क्रिनशॉर्ट मारुन तो सेव्ह करू शकतो. मात्र व्हिडिओचं तसं करता येत नाही. त्यामुळे स्टेटसवरील व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी गुगल फाईल्स हे थर्ड पार्टी तुमची मदत करेल.

- Advertisement -

हेही वाचा – फेसबुकवर Auto tag फोटोची कटकट संपणार, Face Recognition सिस्टिम होणार बंद

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -