भारतात शाओमीचा 8 Pro लॉंच

भारतात शाओमीचा 8 Pro लॉंच

शाओमीचा 8 Pro लॉंच

शाओमीने भारतातील ग्राहकांसाठी पुन्हा एक नवा फोन भेटीस आणला आहे. Redmi 7A ची पुढील आवृत्ती असलेला रेडमी 8A या स्मार्टफोन नंतर शाओमीने भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन रेडमी नोट ८ प्रो (Redmi Note 8 Pro) लॉंच केला आहे. या मोबाईलच्या मागील बाजूस चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा ६४ एमपी (MP) क्षमतेचा असलेला हा पहिलाच फोन आहे. हा Redmi 7A ची पुढील आवृत्ती आहे.

Redmi Note 8 Pro चे कॅमेरा फिचर्स

Redmi Note 8 Pro या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा आहे. विशेष म्हणजे हा एक कॅमेरा सोडून अन्य तीन कॅमेरे हे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय या फोनमध्ये सेल्फीसाठी देखील 20MP क्षमतेचा कॅमेरा देखील आहे.

व्हिडिओ फिचर्स

Redmi Note 8 Pro या स्मार्टफोनमध्ये स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचे देखील फीचर आहे. तसेच यामध्ये 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे.

तीन कलर्समध्ये उपलब्ध

गामा ग्रीन, हेलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा ५ पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत आहे. उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट असून याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल, असा कंपनीने देखील सांगितले आहे.


हेही वाचा – शाओमीचा स्वस्तातला स्मार्टफोन मार्केटमध्ये दाखल


 

First Published on: October 16, 2019 6:13 PM
Exit mobile version