घरट्रेंडिंगशाओमीचा स्वस्तातला स्मार्टफोन मार्केटमध्ये दाखल

शाओमीचा स्वस्तातला स्मार्टफोन मार्केटमध्ये दाखल

Subscribe

फ्लिपकार्ट आणि mi.com वर हा सेल असणार आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या किंमतीत हा स्मार्टफोन आहे.

शाओमीने त्याच्या भारतातील ग्राहकांसाठी स्वस्तातला स्मार्ट फोन मार्केटमध्ये लाँच केला आहे. Redmi 7A ची पुढील आवृत्ती असलेला रेडमी 8A असे या स्मार्टफोनचे नाव आहे. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ग्राहकांना स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्ट आणि mi.com वर हा सेल असणार आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या किंमतीत हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनसाठी ‘स्मार्ट देश का दमदार स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन कंपनीने वापरली आहे.

हेही वाचा – प्राणी संग्रहालयातील पिंजर्‍यातून अजगर आले बाहेर; पर्यटकांची उडाली घाबरगुंडी!

रेडमी 8A ची वैशिष्ट्यं

या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत ६ हजार ४९९ रुपये इतकी आहे. 2GB रॅम + 32GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची ही किंमत आहे. तर, 3GB रॅम +32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. Midnight Black, Ocean Blue आणि Sunset Red अशा तीन रंगात ग्राहकांना हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. शाओमीच्या Redmi 8A स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा (१५.८ सेंटिमीटर) डॉट नॉच डिस्प्ले आहे. ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५’ चा सपोर्ट या फोनमध्ये असून Aura Wave ग्रिप डिझाइन आहे. AI फेस अनलॉक फीचर असलेल्या या स्मार्टफोनमध्ये वायरलेस FM रेडिओ देखील आहे. या स्मार्टफोनसाठी ‘स्मार्ट देश का दमदार स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन कंपनीने वापरली आहे. Redmi 8A मध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सीम आणि डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची मेमरी 512 GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर आहे. फोनच्या पुढील बाजूला सेल्फीसाठी ८ MP क्षमतेचा कॅमेरा आहे. तर, फोनच्या मागील बाजूला १२ मेगापिक्सल क्षमतेचा Sony IMX 363 सेंसर आहे. यामध्ये AI पोट्रेट मोड आणि Type-C USB आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये स्प्लॅश-प्रूफ P2i टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे. असा हा स्मार्टफोन भारतातील ग्राहकांच्या खिशाला परवडणारा ठरु शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -