SBI Relief to customers: SBI चा मोठा निर्णय! आता IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्विस चार्ज लागणार नाही

SBI Relief to customers: SBI चा मोठा निर्णय! आता IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्विस चार्ज लागणार नाही

देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. SBI ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन IMPS ( Immediate Payment Service)  द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणताही सर्विस चार्ज भरण्याची गरज नाही. SBI हा सर्विस चार्ज काढून टाकला आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी SBI ने सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. याआधी SBIने IMPSद्वारे २ लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्विस चार्ज काढून टाकला होता. मात्र आता ५ लाखांपर्यंतचा सर्विस चार्ज काढून टाकला आहे. हा नवीन नियम १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे.

SBI ने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाविषयी SBI ने म्हटले आहे की, भविष्यात डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आला आहे. आता SBI ग्राहक YONO त्याचप्रमाणे मोबाईल बँकिंगचा वापर करुनही ५ लाखांपर्यंतचे पैसे IMPS द्वारे ट्रान्सफर करू शकतात. बँकेकडून यासाठी कोणताही सर्विस चार्ज लागणार नाही. SBI च्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि डिजिटल बँकिंगची सेवा आणखी सोपी झाली आहे.

SBI ने ५ लाख रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणताही सर्विस चार्ज काढून टाकला असला तरी बँकेच्या शाखेतून IMPSवर सर्विस चार्ज लावण्यात येईल. नवीन स्लॅब अंतर्गत ग्राहकांना २ ते ५ लाखांपर्यत पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास IMPS नुसार २० रुपये आणि GST सर्विस चार्ज भरावा लागणारआहे.

NEFT आणि RTGS या सर्विसपेक्षा ग्राहकांमध्ये IMPS सर्वाधिक लोकप्रिय आहे कारण याद्वारे २४ तासात कधीही तुम्ही त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकता. बँकेच्या शाखेतून जर तुम्ही १ हजार ते १० हजारांपर्यत पैसे ट्रान्सफर करणार असाल तर त्यावर २ रुपये आणि GST भरावा लागतो. त्याचप्रमाणे IMPS १० हजार रुपये ते १लाख पर्यंत पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास ४ रुपये आणि GST भरावे लागतात. त्यानंतर १ लाख ते २ लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर १२ रुपये आणि GST सर्विस चार्ज भरावा लागतो.


हेही वाचा – देशात ४०० शहरांमध्ये OLAचे ४ हजारांहून अधिक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार; ग्राहकांना ई-स्कूटर फ्रीमध्ये चार्ज करून मिळणार

First Published on: January 4, 2022 10:59 PM
Exit mobile version