Signal App झाले डाऊन; कंपनी म्हणाली, ‘मित्रांनो प्रतिक्षा करा’

Signal App झाले डाऊन; कंपनी म्हणाली, ‘मित्रांनो प्रतिक्षा करा’

Signal App झाले डाऊन; कंपनी म्हणाली, 'मित्रानों प्रतिक्षा करा'

व्हॉट्सॲपचा (Whatsapp) प्रतिस्पर्धक आणि आपल्या प्रायव्हसी पॉलिसीसाठी लोकप्रिय असलेला सिग्नल ॲप (Signal App) जगभरात काम करत नाही आहे. भारतातील सिग्नलच्या युजर्सना ना मॅसेज पाठवता येतोय, ना कॉल करता येतोय. सिग्नलची सर्व्हिस पूर्णपणे बंद झाली आहे आणि अशी परिस्थितीत कधी पर्यंत असेल याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही आहे.

सिग्नल ॲप सोमवारी सकाळी ओपन करायला गेले तर ते ओपन होत नव्हते आणि त्याऐवजी एक मॅसेज येत होता. ज्यामध्ये लिहिले होते की, ‘सिग्नलमध्ये तांत्रिक अडचण येत आहे. आम्ही लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत.’

याबाबत कंपनीने ट्वीटवर देखील सांगितले की, ‘मित्रांनो थोडी प्रतिक्षा करा. आपली सेवा काही भागांमध्ये एका होस्टिंग आउटेज कारणामुळे सिग्नल आता बंद आहे. आम्ही ठिक करण्यासाठी काम करत आहोत.’

यापूर्वी जानेवारी महिन्यांमध्ये कंपनीला अशा प्रकारच्या समस्येला सामोर जावे लागले होते. व्हॉटसॲपच्या प्रायव्हेसी पॉलिसी अपडेट केल्यानंतर लोकं सिग्नलचा वापर करू लागले. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी सिग्नल ॲप वापर करण्यावर जोर दिला होता. त्यांनी दोन शब्दात ट्वीट केले होते की, ‘Use Signal’. यानंतर सिग्नल ॲप डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले.

आता सिग्नल ॲप आयफोन, आयपॅड, एँड्रॉइड, विंडोज, मॅक आणि लिनक्ससारख्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये डाऊनलोड करू शकता. इतर मॅसेजिंग ॲपप्रमाणे सिग्नल ॲपमधून मॅसेज, फोटो, व्हिडिओ आणि लिंक्स शेअर करू शकता. याशिवाय या ॲपमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. अलीकडेच सिग्नलने ग्रुप व्हिडिओ कॉलचे फीचर आणले, ज्यामध्ये एकावेळी १५० लोकांना व्हिडिओ कॉलमध्ये सामील करू शकता.


हेही वाचा – Jio Phone Next ला ‘हा’ स्मार्टफोन देणार टक्कर; जाणून घ्या किंमत


 

First Published on: September 27, 2021 2:39 PM
Exit mobile version