सावधान! स्मार्टफोनमधील ‘हे’ Android apps ठरू शकतात धोकादायक

सावधान! स्मार्टफोनमधील ‘हे’ Android apps ठरू शकतात धोकादायक

स्मार्टफोनमधील 'हे' Android apps ठरू शकतात धोकादायक

Android फोन वापरताना त्याच्या सुरक्षिततेबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. यापु्र्वी अशा अनेक घटना समोर आल्या होत्या ज्यात Google Play Store वर असे अॅप्लिकेशन उपलब्ध होते की, ते युजर्सची वैयक्तिक माहिती चोरू शकत होते. त्यामुळे युजर्सला याचा धोका अधिक होता. Check Point Research ने सादर केलेल्या नव्या अहवालानूसार, Android स्मार्टफोनमध्ये असणारे असे काही १९ अॅप्लिकेशन्स आहेत ज्यामुळे ते धोकादायक ठरू शकतात. फेसबूकपासून इन्स्टाग्रामपर्यंत अनेक अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. मात्र त्याच्या सुरक्षेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावरील काही असे अॅप्लिकेशन्स आहेत की त्यांच्या कंपनीकडून या अॅप्सना मालवेअर कमांड्स देणं सोपे झाले आहे, त्यामुळे युजर्सचा डाटा आणि माहिती चोरी करता येऊ शकते.

‘हे’ अॅप्लिकेशन ठरू शकतात धोकादायक

या अॅप्लिकेशन्समध्ये असणाऱ्या कमतरतेमुळे हॅकर्स मालिशियस कमांड देऊ शकतात. याची युजर्सना कोणतीच माहिती मिळत नाही, त्यामुळे त्यांची वैयक्तिक माहिती चोरी केली जात आहे, हे देखील त्य़ांना कळत नाही. त्यामुळे सुरक्षित नसणाऱ्या मोबाईल अॅप्लिकेशन्सना आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करणं टाळणे आवश्यक आहे. Google ने याबद्दल तपास सुरू केला असून फेसबूकने यावर त्याच्या युजर्सना असे सांगितले की, फेसबूक अॅप्लिकेशनचा विशेष कोड्स असल्याने हे सुरक्षित अॅप्लिकेशन आहे. या अॅप्लिकेशनच्या वापराने कोणताही धोका नाही.


हरवलेला फोन आता स्मार्ट बँड शोधणार!
First Published on: November 25, 2019 2:49 PM
Exit mobile version