इन्स्टाग्राम युजर्स आहात? मग वाचाच!!

इन्स्टाग्राम युजर्स आहात? मग वाचाच!!

इन्स्टाग्राम

सोशल मीडिया. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप असे एक ना अनेक प्लॅटफॉर्म सध्या उपलब्ध आहेत. या साईटवर अकाऊंट ओपन करताना आपण आपली सर्व माहिती देतो. पण, त्या माहितीचं नेमकं काय होतं? आपला डेटा खरंच सुरक्षित आहे का? याचा केव्हा तुम्ही विचार केला आहे? पण तो आता करा. कारण यापूर्वी फेसबुकवरील डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर फेसबुकला टिकेचा देखील सामना करावा लागला होता. पण, आता इन्स्टाग्रामवरील डेटा देखील सुरक्षित नसल्याची बाब आता समोर आली आहे. फेसबुकनं इन्स्टाग्राम विकत घेतलं. पण, युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेची गॅरंटी कोण घेणार? इन्स्टाग्रामवरील डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. अॅपमधील काही त्रुटींमुळे डेटाची चोरी झाल्याचा दावा ‘द व्हर्ज’नं केला आहे.

फेसबुकवरच्या डेटा लीकप्रकरणी मार्क झकरबर्गवर अध्यक्षपद सोडण्यासाठी आता दबाव वाढत आहे. त्याचवेळी  इन्स्टाग्रावरचा  डेटा देखील लीक झाल्याने किंवा चोरीला गेल्यानं मार्क झकेरबर्गच्या अडचणी वाढत आहेत. शिवाय फेसबुकवरचा लोकांचा विश्वास देखील उडत चालला आहे. इन्स्टाग्रामच्या ‘डेटा डाउनलोड टूल’मध्ये काही चुका समोर आल्या आहेत. त्यामुळे युजरचा डेटा लीक होत आहे. त्यामुळे इन्टाग्रामचा पासवर्ड बदला अशी सुचना कंपनीतर्फे युजर्सना करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील इन्स्टाग्राम वापरत असाल तर तुमचा पासवर्ड बदला.

वाचा – आता लवकरच येणार इन्टाग्राम शॉपिंग अॅप

First Published on: November 19, 2018 4:12 PM
Exit mobile version