Vivo चा बंपर धमाका, भारतात ११ नवीन स्मार्टफोन करणार लाँच

Vivo चा बंपर धमाका, भारतात ११ नवीन स्मार्टफोन करणार लाँच

चीनमधील स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेली ‘विवो’ कंपनी भारतातील ग्राहकांसाठी एक-दोन नाहीतर तब्बल ११ स्मार्टफोन एका पाठोपाठ लाँच करण्याच्या तयारीत आहे. एप्रिल महिन्यापर्यंत येणाऱ्या या साीरीजमध्ये एका पेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. विवोप्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

विवो पुढील महिन्यात मार्चच्या अखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या सुरुवातीला Vivo X60 series आणि Vivo X50+ स्मार्टफोन्सला लाँच करणार आहे. विवो Vivo X60 Pro+ हा gimble स्टॅबलाइजेशन सोबत येतो. यापूर्वी सर्वांत पहिले Vivo X50 Pro मध्ये पाहिले होते. यामध्ये कॅमेरा लेन्सद्वारे जबरदस्त ट्रान्समिशमसाठी Zeiss T* कोटिंग असणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. या फोनच्या ४८ मेगापिक्सलचा, Sony IMX598 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबत ५० मेगापिक्सलचा Samsung GN1 कैमरा सेंसर, 32 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा पेरीस्कोप सेन्सर आहे. व तसेच ह्यात ६० एक्स सुपर झूम सपोर्ट करतो. Vivo X60 Pro+ मध्ये 6.56 इंचाचा अमोलेड डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,200 mAh ची बॅटरी दिली असून स्कोरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. याबरोबरच यात 55 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

विवो एक्स 60 सीरीज सोबत भारतात Vivo X50 Pro+ ला सुद्धा लाँच करण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी Vivo V21 series च्या अंतर्गत विवो वी21 आणि विवो वी21 प्रो स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. शिवाय Vivo X60 अंतर्गत Vivo X60 , Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला बाजारात आणण्यात येणार आहेत. विवो कंपनीने आपल्या Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला Snapdragon 888 पॉवर्ड प्रोसेसर सोबत बाजारात उतरवले होते. विवोने आतापर्यंत भारतात बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सला लाँच केले आहे. पण आता vivoX50 सीरिजनंतर हा दुसरा स्मार्टफोन असणार आहे.


हे ही वाचा- 5 कॅमेऱ्यांच्या Nokia 5.4 स्मार्टफोन आजपासून उपलब्ध; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

 

First Published on: February 17, 2021 2:13 PM
Exit mobile version