What’s Appचे View Once फिचर लाँच, आता मेसेज सीन केल्यावर होणार गायब

What’s Appचे View Once फिचर लाँच, आता मेसेज सीन केल्यावर होणार गायब

WhatsApp Update : २० लाखाहून अधिक भारतीयांचे व्हॉट्सअप बंद, नेमकं कारण काय?

जगभरात सर्वाधिक युझर्स असलेले व्हॉट्स अँप हे इस्टंट मेसेजिंग अँप नेहमीच युझर्ससाठी नवीन फिचर्स आणत असते. यावेळी व्हॉट्स अँपने युझर्ससाठी नवीन फिचर लाँच केले आहे. यावेळी व्हॉट्स अँपने व्यू वन्स (View Once ) हे नवे फिचर लाँच केले आहे. या नव्या फिचरमुळे व्हॉट्स अँपवर आलेले मेसेज वाचल्यानंतर ते लगेच गायब होणार आहेत. मेसेज व्हॉट्स अँपवर आलेला मेसेज एकदा वाचल्यानंतर तो पुन्हा वाचता येणार नाही, असे व्हॉट्स अँपने म्हटले आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी याविषयी माहिती दिली आहे. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्स अँपचे हे फिचर सर्व बीटा युझर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. WABetainfo ने याचा एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. (What’s App View Once feature launch, message disappears after scene)


WABetainfo दिलेल्या माहितीनुसार, युझर फोनच्या गॅलरीमधून फोटो, व्हिडिओ सोप्या पद्धतीने डिसअॅपरिंग करुन सेंड करु शकतात. यासाठी गॅलरीमधून फोटो शेअर केल्यानंतर युझरला वॉच या आयकॉनवर क्लिक करावे गालणार आहे. फोटो सेंड करताना कॅप्शन बारमध्ये हा पर्याय दिसेल.

View Once Modeमध्ये फोटो व्हिडिओ सेंड करताना व्हॉट्स अँप युझर्सला पहिल्यांदा मीडिया सिलेक्ट करावी लागले आणि त्यानंतर क्लॉक लाइन या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. तिथे Add a caption असा पर्याय दिसेल. यानंतर कोणताही व्हिडिओ किंवा फोटो शेअर केल्यानंतर इतर व्यक्तींना तुमचे व्हिडिओ फोटो एकदाच पाहता येणार आहे. मेसेज पाठवणाऱ्या युझर्सला मेसेज डिलीव्हर झाला आहे किंवा रिसिव्ह केला आहे का हे देखील पाहता येणार आहे. एक वेळा पाहण्याची लिमिट संपल्यानंतर मेसेज पाहणारा त्याचा स्क्रिनशॉर्ट घेऊ शकतो.


हेही वाचा – जिओ,एअरटेल,वोडाफोनचा धमाकेदार One Year Recharge plan जाणून घ्या

 

First Published on: June 30, 2021 5:29 PM
Exit mobile version