घरटेक-वेकजिओ,एअरटेल,वोडाफोनचा धमाकेदार One Year Recharge plan जाणून घ्या

जिओ,एअरटेल,वोडाफोनचा धमाकेदार One Year Recharge plan जाणून घ्या

Subscribe

प्लॅनसोबत कंपनीकडून ग्राहकांना खास फिचर्स आणि ऑफर्सही

बऱ्याचदा आपल्या फोनचा रिचार्ज संपला आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. बरेचजण एक महिन्याचा रिचार्ज करतात. मात्र रिचार्ज संपल्यावर पुन्हा रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. मात्र जिओ, एअरटेल आणि वोडाफोने त्यांचा धमाकेदार one Year Recharge Plan आणला आहे. या प्लॅनसोबत कंपनीने ग्राहकांना खास फिचर्स आणि ऑफर्सही दिल्या आहेत. त्यामुळे या प्लॅनमुळे पुढील वर्षभरासाठी फोनचा रिचार्ज संपण्याची काळजी राहणार नाही. जाणून घ्या काय आहे जिओ,एअरटेल,वोडाफोनचा धमाकेदार One Year Recharge plan

Airtel One Year Recharge plan

एअरटेलचा एक वर्षाचा रिचार्ज प्लॅन १,४९८ रुपयांचा आहे. या प्लॅनसोबत ३६५ दिवसांची वॅलिडिटी मिळते. तर २४ GB डेटा, अनलिमिटिडे कॉलिंग आणि ३६०० SMS देण्यात आले आहेत. तर दुसरा प्लॅन आहे २,४९८ रुपयांचा. यातही ४६५ दिवसांच्या वॅलिडिटीसह डेली २GB डेटा अनलिमिटिटेड कॉलिंग आणि १०० SMS ची सेवा देण्यात आली आहे. एअरटेलच्या या दोन्ही प्लॅनमध्ये फ्री हॅलोट्यून, Wynk Music, Airtel Xstream Premiun आणि ३० दिवसांचे Prive Video सबस्क्रिप्शन सेवा मिळणार आहे.

- Advertisement -

Jio One Year Recharge plan

जिओचा एक वर्षांचा रिचार्ज २१२१ रुपयांचा आहे. त्यात ग्राहकांना डेली १.५ GB डेटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० SMSची सुविधा देण्यात आलीय तसेच या प्लॅनमध्ये जिओ अँप्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे.

Vodafone idea One Year Recharge plan

Vodafone ideaचा एक वर्षांचा रिचार्ज घेण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेत. त्यातील पहिला प्लॅन १४९९ रुपयांचा आहे तर दुसरा प्लॅन २३९९ रुपयांचा आहे. १४९९ च्या प्लॅनमध्ये २४ GB डेटा त्याचप्रमाणे अनलिमिडेट कॉलिंग आणि ३६०० फ्री SMSची सेवा देण्यात आली असून २३९९च्या दुसऱ्या प्लॅनमध्ये डेली १.५ GB डेटा आणि १०० SMSची सेवा देण्यात आली आहे. Vodafone idea च्या या दोन्ही प्लॅनमध्ये त्याचप्रमाणे विकेंडला डेटा रोलओव्हरची सुविधा देखील देण्यात आलीय. त्याचप्रमाणे Vi Movies And TV Classic, Binge All night ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लवकरच Marutiच्या ३ कार होणार लाँच; जाणून घ्या किंमत

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -