What’s App Privacy Policy न स्विकारलेल्या युजर्सचे व्हॉट्स अँप कॉलिंग झाले बंद

What’s App Privacy Policy न स्विकारलेल्या युजर्सचे व्हॉट्स अँप कॉलिंग झाले बंद

What's App Privacy Policy न स्विकारलेल्या युजर्सचे व्हॉट्स अँप कॉलिंग झाले बंद

व्हॉट्स अँप प्रायव्हसी पॉलिसीवरुन (What’s App Privacy Policy )अनेक संभ्रम निर्माण झाले होते. व्हॉट्स अँप प्रायव्हसी पॉलिसी न स्विकारल्यास व्हॉट्स अँप वापरता येणार नाही असे व्हॉट्स अँपकडून सांगण्यात आले होते. नवीन व्हॉट्स अँप पॉलिसी अक्सेप्ट करण्यासाठी व्हॉट्स अँपने आता रिमाइंडर द्यायला सुरुवात केली आहे. हॉट्स अँपने १५ मे पर्यंत व्हॉट्स अँप पॉलिसी स्विकारण्यासाठी सांगितले होते. मात्र ज्यांनी ही पॉलिसी अक्सेप्ट केलेली नाही अशा अनेक युझर्सचे व्हॉट्स अँप कॉलिंग (WhatsApp calling) बंद होत आहेत. बरेच व्हॉट्स अँप युझर्स व्हॉट्स अँप कॉलिंग करु शकत नाहीत किंवा त्यांना कॉलिंग करताना अडथळे येत आहेत. त्याचप्रमाणे काहींना व्हिडिओ कॉलिंग करतानाही अडथळे येत आहेत. व्हॉट्स अँपकडून हळू हळू ऑडिओ आणि व्हिडिओ सेवा कमी करण्यात येत आहे. त्यामुळे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा परत मिळवण्यासाठी What’s App Privacy Policy अँक्सेप्ट करावी लागणार आहे. (WhatsApp calling Feature has stopped of users who do not accept What’s App Privacy Policy )

ज्या युझर्सनी Privacy Policy अँक्सेप्ट केलेली नाही त्यांना व्हॉट्स अँप कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगमध्ये अडथळा येत आहे तर काहींना यात कोणताही अडथळा येत नाही. मात्र व्हॉट्स अँपकडून युझर्ससाठी एक पॉप येत आहे. ज्यात व्हॉट्स अँप Privacy Policy अँक्सेप्ट करण्याची आठवण करुन देत आहे.

गेल्या आठवड्यात IT मंत्रालयाने व्हॉट्स अँपला privacy Policy मागे घेण्यास सांगितले होते. व्हॉट्स अँपकडून जर याबाबतीत योग्य उत्तम मिळाले नाही तर या विरोधात कारवाई केली जाईल असेही सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु व्हॉट्स अँपकडून याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. सरकारने व्हॉट्स अँला ७ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे पुढील काळात व्हॉट्स काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – twitterने पुन्हा सुरु केलं पब्लिक वेरिफिकेशन, Blue Tick वेरिफिकेशनच्या सोप्या स्टेप्स

First Published on: May 24, 2021 5:30 PM
Exit mobile version