व्हॉट्सAPP चॅटिंगमध्ये ‘टाइपरायटर फॉन्ट’साठी ‘हे’ करा

व्हॉट्सAPP चॅटिंगमध्ये ‘टाइपरायटर फॉन्ट’साठी ‘हे’ करा

असं करा आणि व्हॉट्सAPP चॅटिंगमध्ये 'टाइपरायटर फॉन्ट'ची मज्जा घ्या

सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरण्यात येणाऱ्या APP पैकी व्हॉट्सAPP हे एक आहे. हे APP जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीस पडणारे आहे. हे व्हॉट्सAPP लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येत असतात. आताही व्हॉट्सAPPने एक नवे फीचर युजर्स करता आणले आहे. या फीचर्समुळे युजर्सना चॅटिंगची अधिक मज्जा घेता येणार आहे.

व्हॉट्सAPP ने खूप आधी युजर्सच्या चॅटिंगचे टेक्स्ट फॉर्मेट बदलणारे फीचर आणले होते. या फीचरमुळे चॅटिंग करताना युजर्सना मज्जा येत होती. कारण युजर्स आपल्या आवडीचे फॉन्ट वापरत होते. मात्र, आता तुम्हाला अधिक ‘टाइपरायटर फॉन्ट’ची मज्जा घेता येणार आहे. कारण तुम्ही टेक्स्ट फॉर्मेटला टाइपरायटर फॉन्टमध्येही बदलू शकतात हे माहिती आहे का? पहिले तीन फॉन्ट काही कमांडसह सहजरित्या बदलता येतात. पण, टाइपरायटर फॉन्टसाठी तुम्हाला अधिक ट्रिकची आवश्यकता आहे.

असा वापरा हा फॉन्ट

‘टाइपरायटर फॉन्ट’ची मज्जा घ्याची असल्यास सुरुवातीला तुम्ही ` चिन्ही तिन्ह वेळा टाइप करा आणि त्यानंतर तुम्हाला जो मेसेज हवा आहे तो टाइप करा आणि त्यानंतर ` हे चिन्ह टाका आणि मेसेज सेंड करा, असे केल्याने तुमचा फॉन्ट बदलेला तुम्हाला दिसेल. उदारणार्थ ` ` `Hi` ` `. यानंतर तुमचा मेसेज टाइपरायटर फॉन्टमध्ये बदलेले दिसेल. तसेच हे फीचर Android आणि iOS, दोन्ही कीबोर्डवर उपलब्ध आहे. हे करताना सिंबॉल ` च्या ऐवजी सिंबॉल ‘ चा वापर करणार नाहीत याची काळजी घ्या. अँड्रॉइड कीबोर्डवर सिंबॉल ` सहजरित्या मिळेल, पण आयफोन कीबोर्डवर हा सिंबॉल शोधण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल.


हेही वाचा – गुगलच्या प्रमुखांची सकाळ गुगलने नाही तर वर्तमानपत्राने होते


First Published on: January 13, 2020 4:05 PM
Exit mobile version