नव्या वर्षात What’s App आणणार ३ नवे फिचर्स

नव्या वर्षात What’s App आणणार ३ नवे फिचर्स

व्हॉट्स App नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवीन नवीन बदल करत करत असतो. व्हॉट्स Appवर नेहमीच वेगळे आणि भन्नाट फिचर्स येत असतात. व्हॉट्स App युझर्सची संख्या जास्त असल्याने व्हॉट्स App नेहमीच अपडेट राहत असते. २०२१ या नव्या वर्षात व्हॉट्स App ३ भन्नाट फिचर्स लाँच करत करणार आहे. या नव्या फिचर्समुळे चॅटिंगचा आणि व्हिडिओ कॉलिंगचा एक वेगळा आनंद लुटता येणार आहे. जाणून घेऊया कोणते आहेत ते फिचर्स.

मल्टीपल पेस्ट

२०२१मध्ये व्हॉट्स App एक खास फिचर लाँच करणार आहे. यात रोलआऊट केल्यानंतर सहजपणे फोटो आणि व्हिडिओ एकत्र कॉपी करून चॅटमध्ये पोस्ट करू शकतो. यासाठी व्हॉटस App सध्या फिचरच्या बीटा व्हर्जनची चाचणी करत आहे. त्यामुळे हे फिचर लवकरच व्हॉट्स Appवर येऊ शकते.

डेक्सस्टॉपवर व्हि़डिओ कॉलिंगचा आनंद

व्हॉट्स App वेब वापरणाऱ्या युझर्सना हे फिचर खूपच उपयोगी पडणार आहे. व्हॉट्स Appच्या नव्या फिचरमुळे लॅपटॉप किंवा डेक्सस्टॉपर व्हिडिओ कॉलिंग किंवा ऑडिओ कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. या फिचरमुळे व्हॉट्स Appची थेट स्पर्धा ही स्काईप, झूम, गुगल मीट यांसारख्या Appशी होणार आहे.

व्हॉट्स App टर्म्स पॉलिसी

नवीन वर्षात व्हॉट्स App वापरायचे असल्यास काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत. व्हॉट्स App आता नवीन पॉलिसी आणणार आहे. ही पॉलिसी नाकारल्यास तुमचे व्हॉट्स App अकाऊंट बंद केले जाईल. व्हॉट्सApp च्या नवीव पॉलिसीमध्ये स्क्रिनशॉट्सचा ट्रॅक करणारी एक वेबसाइट असणार आहे. या वेबसाइटमध्ये असे स्पष्टपणे म्हटले आहे की युझर्सनी अटी मान्य केल्या नाही तर त्यांचे व्हॉट्स App अकाउंट बंद करण्यात येईल.


हेही वाचा – कसे वापराल इन्स्टाग्राम लाइव्ह रूम फिचर ?

First Published on: December 25, 2020 10:49 PM
Exit mobile version