अर्धवट खाल्लेल्या सफरचंदासारखा का आहे Apple कंपनीचा लोगो? जाणून घ्या कारण

अर्धवट खाल्लेल्या सफरचंदासारखा का आहे Apple कंपनीचा लोगो? जाणून घ्या कारण

तंत्रज्ञानाच्या दुनियेत माणूस प्रचंड प्रगती करत आहे. या दुनियेत एक नाव कायम चर्चेत असते ते म्हणजे Apple कंपनीचे. आपल्या खास प्रॉडक्टनी कंपनीने मोबाईल, कॉम्प्युटर्सच्या बाजारात आपले हक्काचे स्थान मिळवले. Apple कंपनीचे नाव आज जगभरात आहे. परंतु कंपनीच्या नावापेक्षा कंपनीच्या लोगोची देखील बऱ्याचदा चर्चा होत असते. अर्धवट खाल्लेल्या सफरचंदासारखा Apple कंपनीचा लोगो आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंपनीने असा लोगो ठेवण्यामागचे कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलायत का ? या जाणून घेऊया apple कंपनीच्या लोगोमागची कहाणी.

कोणत्याही कंपनीचा लोगो हा पूर्ण असतो. लोगोमुळे कंपनीचे नाव प्रसिद्ध होते. परंतु apple कंपनीचा लोगो हा अपूर्ण आहे मात्र तरीही तो लोकांना खास वाटतो. १९७६ साली apple कंपनीची स्थापना झाली. तेव्हापासून कंपनीचा लोगो अर्धवट सफरचंद खाल्ल्यासारखाच आहे. आधी आयझॅक न्यूटनचा लोगो तयार करण्यात आला त्यावर एक सफरचंद लटकवण्यात आले होते. मात्र १९७७ मध्ये कंपनीचा को फाउंडर स्टीव जॉब्सने रॉब जैनॉफ नावाच्या एका ग्राफीक डिझायनकडे एक नवा लोगो तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा त्याने रेनबोच्या रंगातला अर्धवट खाल्लेला लोगो डिझाइन केला.

कोड्सजेस्चर नावाच्या एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ग्राफीक डिझाइनर रॉबने एका मुलाखतीत apple कंपनीचा लोगो डिझाइन करण्यामागचे कारण सांगितले होते. तो म्हणाला,  तो चेरी किंवा टमाटर नसून सफरचंद आहे हे लोकांना कळावे यासाठी लोगो अशाप्रकारे डिझाइन करण्यात आला.

४० वर्षात बदलला Apple चा रंग

Appleचा पहिला लोगो हा रेनबोच्या रंगाचा होता. जो १९७७ साली तयार करण्यात आला होता. स्टीव जॉब्सचे म्हणणे होते की, कंपनीला एका मानवीय दृष्टिकोनातून पाहिले जावे. जनॉफने म्हटले होते की, इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे हा लोगो तयार करण्यात आला नव्हता. लोगोच्या वरच्या बाजूला पान होते त्यामुळे त्याचा पहिला रंग हा हिरवा ठेवण्यात आला होता. त्यानंतर १९९८ साली Apple चा लोगो एकाच रंगात ठेवण्यात आला. कधी तो निळा रंगात तर कधी ग्रे तर कधी शाइनिंग ग्रे रंगात ठेवण्यात आला. सध्याचा Apple च्या लोगोचा रंग हा काळा आहे.


हेही वाचा –  इंटरनेटशिवाय Googleचे हे फिचर करते काम; जाणून घ्या वापर करण्याची सोपी पद्धत

First Published on: March 6, 2022 7:45 PM
Exit mobile version