लवकरच Mi 10 5G भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

लवकरच Mi 10 5G भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

लवकरच Mi 10 5G भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

फेब्रुवारीमध्ये शाओमीने फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 10 5G सिरीज लाँच केली होती. क्वालकॉम स्नॅनड्रॅगन 865 मोबाईल प्लॅटफॉर्मसह येणारी ही जगातील पहिली स्मार्टफोन सिरीज होती. मागील महिन्यात या स्मार्टफोनला भारतात लाँच केले जाणार होते. परंतु कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे लाँच केले गेले नाही. आता या स्मार्टफोनला कंपनी भारतात ८ मेला लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे. भारतात या स्मार्टफोन सिरीजमधील फक्त बेस मॉडेल Mi 10 5G लाँच केले जाणार आहे. Mi 10 pro 5G भारतात लाँच होईल की नाही याबद्दलच्या कोणत्याही माहितीचा खुलासा करण्यात आलेला नाही.

Mi 10 5G फीचर्स

Mi 10 5G मध्ये 108Mp रिअर कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन 6.67 इंच फुल एचडी प्लस कर्व्हड् AMOLED डिस्प्लेसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सपोर्टसह आला आहे. या फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित असून MIUI 11 वर रन करत आहे.

फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा फिचर्स आहेत. यामध्ये 108MP चा प्राइमरी सेंसर दिला आहे. याशिवाय फोनच्या मागे 13MP चा वाइड अँगल सेंसर, 2MP चा पोट्रेट लेंस आणि 2MP चा मॅक्रो सेंस यामध्ये आहे. सेल्फीसाठी 20MP चा कॅमेरा आहे. फोनच्या रिअर कॅमेरामधून 8K क्वालिटी व्हिडिओ शूट करू शकतो. तसेच फोनमध्ये 30W की फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले आहे. फोनमध्ये पॉवर देण्याकरिता 4,780mAh ची बॅटरी दिली आहे.

चीनमध्ये सुरुवातील Mi 10 चा 8GB RAM + 128GB वॉरंटीचा स्मार्टफोन CNY 3,999 म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ४०,००० रुपये किंमतीने लाँच करण्यात आला. तसेच 8GB RAM + 256GB वॉरंटीची किंमत CNY 4, 299 म्हणजे जवळपास ४३, ००० रुपये आहे. शिवाय 12GB RAM + 256GB वॉरंटीची किंमत CNY 4,699 म्हणजेच ४७,००० रुपयांचा आहे. हे स्मार्टफोन टायटॅनियम सिल्वर ब्लॅक, पीच गोल्ड आणि आईस ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये भारतात लाँच केले जाऊ शकतात.


हेही वाचा – लॉकडाऊन काळात सॅमसंगचे हे दोन स्मार्टफोन झाले स्वस्त


 

First Published on: May 4, 2020 7:34 PM
Exit mobile version