Rajan Vichare : ठाण्यात शिंदेंना नडणाऱ्या राजन विचारेंच्या संपत्तीत पाच वर्षांत 11 कोटींची वाढ

Rajan Vichare : ठाण्यात शिंदेंना नडणाऱ्या राजन विचारेंच्या संपत्तीत पाच वर्षांत 11 कोटींची वाढ

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता एकनिष्ठ राहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजन विचारे यांना ठाण्यातून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता ठाणे मतदारसंघातील निवडणूक ही महायुतीसाठी खासकरून एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान, राजन विचारे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी अर्जासोबत त्यांच्या संपत्तीचं विवरणपत्र दिलं आहे. राजन विचारे यांच्याकडे जवळपास 26 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात 11 कोटींनी वाढ झाली आहे. (11 crores increase in Rajan Vikhare’s wealth in five years)

राजन विचार यांनी दाखल केलेल्या विवरणपत्रानुसार, त्यांचं शिक्षण एफ.वाय.जे.सी पर्यंत झालं आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 25,82,97,000 आहे. यात रोख रक्कम 1,20,000, जंगम मालमत्ता 1,32,55,125, कर्ज 3,24,78,888, वारसा हक्काने मिळालेली संपत्ती 16,94,631, हुंदाई वेरणा ही गाडी आहे. तसेच रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन, ठाण्यातील चरई भागातील रोझ वूड, दिघे चौकात दुकान, मिरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या 6 ‌फौजदारी गुन्हे देखील आहेत. त्यांच्या पत्नीच्या संपत्तीवर नजर टाकली तर नंदिनी विचारे यांच्याकडे रोख रक्कम 60,000, जंगम मालमत्ता 2,40,32,502, स्थावर मालमत्ता 5,64,45,503, स्थावर मालमत्ता 74,56,420, कर्ज 94,20,232 आहे. याशिवाय इनोव्हा क्रीयस्टा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या दोन गाड्या त्यांच्याकडे आहेत. तर ठाण्यातील जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग भाजपाची धुणीभांडी करतोय काय? ठाकरे गटाचा बोचरा सवाल

2019 मध्ये राजन विचारेंची संपत्ती (Rajan Vichare 2019 Wealth)

राजन विचारे यांची 2019 साली एकूण संपत्ती 14,59,80,198 एवढी होती. त्यांची जंगम मालमत्ता 2,01,15,200, रोख रक्कम 2,00,000, वारसा हक्काने मिळालेली संपत्ती 9,00,000, कर्ज 4,18,57,461 आहे. तसेच फोर्ड एंडेवर आणि मर्सिडीज बेंझ या दोन गाड्या त्यांच्याकडे होत्या. याशिवाय रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन, ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान होते. तर त्यांच्यावर 9 फौजदारी गुन्हे देखील होते. त्यांच्या पत्नी नंदिणी विचारे यांच्याकडे 2,82,93,363 रुपये आणि टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या गाड्या होत्या. तसेच जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूरनिवासमध्ये दुकान होते.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 30, 2024 9:24 AM
Exit mobile version