चैत्र नवरात्रोत्सवात महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन

चैत्र नवरात्रोत्सवात महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन

चैत्र नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी राम नवमीचे औचित्त्य साधून आयोजित केलेल्या स्वरमय निर्मित किरण वेहेले व अमित काकडे प्रस्तुत महाराष्ट्राची लोकरंगधारा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन उपस्थितांना घडले. नागरिकांनी या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी परदेशी पाहुणे तसेच नवी मुंबई मुस्लीम समाजाचे आलम बाबा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये गोंधळ-जागरण, भारुड, पोवाडे, लावणी, कोळीगीते व रामाची गीते अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन घडले. तसेच नृत्य नट्याच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री स्वामी समर्थ व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. देवीच्या दर्शनासाठी शिवसेना खासदार संजय राउत साहेब, विनायक राउत, अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, माजी आमदार शिषीर शिंदे, माजी नगरसेवक भैय्यासाहेब इंदिसे यांनी चैत्र नवरात्रोत्सवाला भेट देवून देवीची आरती करून दर्शन घेतले.
खासदारांनी पालखीचे घेतले दर्शन
सुरु असलेल्या चैत्र नवरात्रोत्सव तलावपाळी येथे रामनवमी निमित्त रामाची पालखी व मिरवणूक मोठ्या जल्लोषात आली असताना खासदार राजन विचारे यांनी प्रभू श्री रामाच्या पालखीचे दर्शन घेतले.

First Published on: March 31, 2023 10:53 PM
Exit mobile version