मनसेच्या जमील शेख हत्येची राष्ट्रवादी नेत्याकडून 10 लाखांची सुपारी

मनसेच्या जमील शेख हत्येची राष्ट्रवादी नेत्याकडून 10 लाखांची सुपारी

मनसेच्या जमील शेख हत्येची राष्ट्रवादी नेत्याकडून 10 लाखांची सुपारी

मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफला शनिवारी मोठे यश मिळाले आहे. एसटीएफने मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी लखनऊ मधून गोरखपूरमधील रहिवासी असलेल्या इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया याआरोपीला अटक केली आहे. जवळपास पाच महिने तो फरार होता. विभूती खंड पोलिस स्टेशन परिसरातील कठौता तलावाजवळ एसटीएफने इरफानला पकडले. जमील शेख यांच्या हत्येसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा च्या एका नेत्याने दहा लाख रुपयांची सुपारी दिल्याचे इरफानने उघड केले.

जमील हे मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष होते. 23 नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हत्येची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. जमील शेख हे बाइकवरुन निघाले होते. त्यावेळी पाठीमागून बाइकवरआलेल्या दोन जणांपैकी बाइकवर मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले होते. गोळी डोक्याच्या मागे गोळी लागल्याने जमील हे बाइकसह खाली कोसळले. हा प्रकार पाहून तेथे आजूबाजूला असलेले सगळेच हादरले. त्यानंतर तातडीने जमील यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच जमील यांचा मृत्यू झाला होता. जमील अहमद शेख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र पोलिस आरोपीच्या शोधात होते. शनिवारी एसटीएफ मुख्यालयात आरोपीला मीडियासमोर सादर केले गेले. अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलं आहे.

First Published on: April 3, 2021 6:21 PM
Exit mobile version