मास्क विना भटकणाऱ्यांवर ठाण्यात कारवाई

मास्क विना भटकणाऱ्यांवर ठाण्यात कारवाई

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापलिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच  स्टेशनसह मुख्यबाजार पेठे परिसरात मास्क विना फिरणाऱ्या १५० जणांवर महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक करवाई करून ७५ हजारांचा दंड वसूल केला. त्याचबरोबर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ अस्थापनांवर सीलची कारवाई केली आहे.

ठाणे महापलिका प्रशासनाने देखील नव्या नियमावलीची अंमलबजावणीला सुरू करत चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात गस्त सुरु केली आहे. तसेच ठाणे स्टेशन परिसरासह मुख्यबाजार पेठेत फिरून पालिका अधिकारी आणि पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून उदघोषणा करून सर्वांना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. स्टेशन परिसरासह मुख्यबाजार पेठे परिसरात मास्क विना भटकणाऱ्या १५० जणांवर पालिका प्रशासनाकडून दंडात्मक करवाई करीत ७५ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच अस्थापनांवर सील करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याकडून पाच हजारप्रमाणे दंड आकारून सील काढल्याचे नौपाडा – कोपरी प्रभाग समितिचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितले.

First Published on: January 12, 2022 9:11 PM
Exit mobile version