भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठामपा-आव्हाड यांचा आरोप

भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठामपा-आव्हाड यांचा आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ट्विट करत, भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महानगरपालिका झाले आहे. असा आरोप केला आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे सगळीकडे काम बंद स्थितीत आहेत. लोक फाईल घ्यायला तयार नाहीत. १ टक्क्यावरच समाधान मानायला हव होते. पण आपली तर भूक इतकी मोठी आहे की आपले सगळे अधिकारी ५ टक्के मागायला लागले आहेत. तसेच जोपर्यंत अधिकाऱ्यांच्या हातात देत नाहीत तोपर्यंत फाईलवर सही होत नाही असे म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात आज ना उद्या नवीन नंदलाल समिती बसवावी लागेल. असे त्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

ठाणे, कळवा, मुंब्रा येथे ठाणे महानगरपालिकेची रस्त्याची कामे चालू आहेत. त्यासाठी खास निधी आणला आहे. ठामपाच्या अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढले आहे. सगळ्या भागातील रस्ते चांगले आहेत फक्त त्याच्यावर नवीन डांबर टाकायचे आणि करोडो रुपयाची बिले काढायची. आणि ह्याच्यात खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहेत. किती फसवणार आहेत ठाणेकरांना असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांनी ते स्वतः हे लिहीत आहे. असे म्हटले आहे.  कोणाच्यात हिम्मत असेल तर माझ्यासोबत चला मी तुम्हांला दाखवतो कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठल्या रस्त्यावर डांबर टाकले आहे.  भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महानगरपालिका झाले आहे. असा आरोप ही केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे स्टँडिंग कमिटीला जास्तीत जास्त एक टक्का ते दिड टक्का घ्यायचे आता महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेट वाढवलेला आहे. आणि तोही किती तर 5 टक्के. आणि जोपर्यंत 5 टक्के (मी नावही जाहीर करेन) ज्या अधिकाऱ्याच्या हातात देत नाहीत तोपर्यंत फाईलवर सहीच होत नाही. असा आरोप करत खळबळ उडवली आहे.

याशिवाय बाहेर आल्यावर स्वतःला अतिशय पापभिरू अधिकारी म्हणून मिरवणारे केबिनमध्ये बसल्यावर रावणाचा अवतार धारण करतात आणि भस्मासूरासारखे वागतात.असेही नमूद केले आहे. ५ टक्के… आयुक्त साहेब तुम्ही तर विचार करा गरीब ठेकेदाराला ५ टक्के एकत्र द्यायला जमतात का? सगळीकडे काम बंद स्थितीत आहेत. लोक फाईल घ्यायला तयार नाहीत. एक टक्क्यावरच समाधान मानायला हव होतं. आपली तर भूक इतकी मोठी आहे की आपले सगळे अधिकारी ५ टक्के मागायला लागले आहेत. आज ना उद्या नवीन नंदलाल समिती बसवावी लागेल. असेही त्यांनी इशारा दिला आहे.

First Published on: May 15, 2023 9:57 PM
Exit mobile version