ठाण्यात सलग तिसर्‍या दिवशी आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू

ठाण्यात सलग तिसर्‍या दिवशी आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू

कोरोना वाढवतोय चिंता 24 तासांत राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्यूची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. सलग तिसर्‍या दिवशी ठाणे जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून शहरी भागातून आता ग्रामीण भागात कोरोनाने मोर्चा वळवून एकाचा बळी घेतला आहे. आठवड्यातील हा चौथा बळी ठरला आहे. दुसरीकडे गुरुवारी जिल्ह्यात नव्याने 36 रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे समाधानकारक बाब म्हणजे गुरुवारी 25 जणांनी कोरोनावर मात करत ते कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत ही घट झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे 36 रुग्ण नोंदवले गेले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक 22 रुग्णांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी 4 ,कल्याण डोंबिवली 3, उल्हासनगर, मीरा भाईंदर, कुळगाव बदलापूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत. तर फक्त भिवंडी एक ही रुग्णाची गुरुवारी नोंद झालेली नाही. मात्र ठाणे ग्रामीण मध्ये एकाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

First Published on: March 23, 2023 10:27 PM
Exit mobile version