सध्या ठाण्याची मालकी कोणाकडे आहे हेच कळत नाही; जितेंद्र आव्हाडांची टीका

सध्या ठाण्याची मालकी कोणाकडे आहे हेच कळत नाही; जितेंद्र आव्हाडांची टीका

सध्या ठाण्याची मालकी कोणाकडे आहे हेच कळत नाही. सर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्त हे त्या-त्या प्रभागाचे राजे असल्यासारखे वागत आहेत. जणू काही ठाणे यांच्या बापाचेच आहे अशी या अधिका-यांची भावना झाली आहे. कोणाचेच कोणावर लक्ष नाही. कोणाचाच कोणाला लगाम नाही. असा स्वैराचार ठाण्यात माजला आहे, असं ट्वीट करत याची दखल आयुक्तांनी घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ( At present it is not known who owns the Thane Criticism of NCP leader Jitendra Awhad CM Eknath Shinde )

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  येऊरचेचं उदाहरण देतो. येऊरमध्ये अनेक जमिनींवर लोक घुसून कब्जा घेतात. तिथे घराचे बांधकाम करायला सुरुवात करतात. जमिन मालक महापालिकेत जातो. 10-10 वेळा जाऊन पाया पडतो, तक्रारी करतो. तेथील अधिकारी सचिन बोरसे हे फावड्याने पैसे ओढत असतात. ते घर बांधणा-याला घर बांधू देतात. तक्रार करणा-याला मी कारवाई करतो…करतो म्हणून सांगतात. पण, तोपर्यंत त्या घराचं बांधकाम पूर्ण होतं. नंतर त्यामध्ये लोकं राहायला जातात. मग सांगतात आता राहायला गेलेत मला आता निष्कासनाची कारवाई करता येणार नाही.

एका प्रकरणात जमीन मालक स्वत: माझ्याकडे आल्यानंतर मी बोरसेंना सांगितले तर त्यांनी मला सांगितले की, आमदार प्रताप सरनाईक यांचा दबाव आहे. मी प्रताप सरनाईक यांच्याशी बोलल्यानंतर प्रताप सरनाईक मला म्हणाले की, मी बोरसेंशी बोलतसुद्धा नाही. असा हा निर्ढावलेला भ्रष्टाचारी अधिकारी हा स्वत:ला अत्यंत हुशार आणि कार्यतत्पर समजतो. तसं तर सगळेच सहाय्यक आयुक्त स्वत:ला तेच समजतात. हे मी स्वत: महापालिका आयुक्तांच्यादेखील कानावर घातलेले आहे. अशा पद्धतीने जर होणार असेल तर यापुढे लोकं बिल्डींगमध्ये घुसूनसुद्धा घराचा कब्जा घेतील का, तर सहाय्यक आयुक्त आमच्या बाजूने आहेत, असा थेट आरोप सहाय्यक आयुक्तांवर आव्हाडांनी केला आहे.

( हेही वाचा: राज ठाकरे -फडणवीस यांच्या भेटीवर राऊतांची खोचक टीका; म्हणाले, ‘ते उत्तम होस्ट…’ )

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बळकावल्या जातायत जमिनी

एकतर ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये हजारो अनधिकृत इमारतींची कामे सुरु आहेत. ठाण्यात काय घडतयं हेच कळेनासे झाले आहे. हे मुख्यमंत्र्यांचे ठाणे आहे याची थोडीतरी लाज त्या सहाय्यक आयुक्तांना वाटली पाहीजे. जर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये बेकायदेशीररीत्या, दादागिरी करुन, जमिन बळकावून, लोकांना घाबरवृून, महापालिका अधिका-यांच्या मदतीने कामे होत असतील. तर मग कोणाकडे न्याय मागायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे हा एक नंबरचा भ्रष्टाचारी अधिकारी आहे. रात्री हॉटेलमध्ये बसून दारु पिणे, तिथे बसून आर.टी.आय. अॅणक्टिविस्ट लोकांना बोलावून घेऊन सेटलमेंट करणे हे त्याचे दररोजचे काम आहे आणि हे त्यालाही माहित आहे की हे सगळं मला माहित आहे. तरी ठाणे महानगरपालिका आयुक्त आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतो आहे त्या आपण पूर्ण कराव्यात एवढीच अपेक्षा, असं म्हणत आव्हाडांनी ठाण्याच्या आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे.

First Published on: May 30, 2023 9:53 PM
Exit mobile version