अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार सोहळा नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत

अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार सोहळा नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत

अंबर भरारी, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित 8 व्या
अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार सोहळा शनिवारी 20 मे रोजी अंबरनाथच्या गावदेवी मैदानामध्ये संपन्न होणार आहे. कला कौस्तुभ शिव मंदिराच्या अस्तित्वात पावन झालेल्या उद्योग नगरी अंबरनाथमध्ये बहू प्रतिष्ठित असा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव साकार केला जातो. मराठी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकार तंत्रज्ञांची उपस्थिती या महोत्सवास लाभत असते.

यावर्षी महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना, ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना कारकीर्द सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांना कारकीर्द गौरव पुरस्कार, तर नंदकुमार पाटील यांना सिने पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कुटुंब योगदान पुरस्कारासाठी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

ताठ कणा, समायरा, गडद अंधार, शेर शिवराज, भिरकीट, ये रे ये रे पावसा, पिकासो या चित्रपटांमध्ये विविध विभागांमध्ये चुरस असून गिरीश कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चिन्मय मांडलेकर, उमेश कामत, प्रणव रावराणे यांना अभिनयातील विविध विभागांसाठी नामांकन प्राप्त झाले आहे. अभिनेत्रींमध्ये नेहा महाजन, मोनालिसा बागल, स्वानंदी बेर्डे, रिंकू राजगुरू, रूपाली भोसले, दीप्ती देवी यांना नामांकन मिळाले आहे. तसेच घोषित पुरस्कारांमध्ये प्रसाद ओक, वर्षा उसगावकर, पोर्णिमा अहिरे, केतकी नारायण यांचा समावेश आहे. अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे संस्थापक सुनील चौधरी, महोत्सव दिग्दर्शक महेंद्र पाटील आयोजक निखिल चौधरी, दत्ता घावट, गुणवंत खेरोदिया, डॉक्टर गणेश राठोड, सर्जेराव सावंत यांनी या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे

First Published on: May 16, 2023 10:17 PM
Exit mobile version