यंदा बदलापूरचा माघी गणेशोत्सव दीड दिवसांचा

यंदा बदलापूरचा माघी गणेशोत्सव दीड दिवसांचा

बदलापुरातील स्टेशन पाडा माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या ५२ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेला माघी गणेशोत्सव यंदा दीड दिवसांचाच असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या आवाहनानुसार मंडळाने हा निर्णय घेतला असून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र थोरात यांनी दिली आहे.

सोमवारी बदलापूरच्या स्टेशनपाडा गणेशोत्सव मंडळाच्या माघी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. बदलापूरच नव्हे तर कल्याण ठाणे, कर्जत, मुरबाड, मुंबई या विविध ठिकाणच्या भाविकांचे हा गणपती श्रद्धास्थान असल्याने दरवर्षी माघी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत हजारो भाविक आवर्जून या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. स्टेशन पाडा माघी गणेशोत्सव मंडळ पौराणिक कथांवर आधारित चलचित्र देखावे करणारे मंडळ म्हणून प्रसिध्द आहे. हे देखावे भाविकांचे आकर्षण ठरत असते. माघी गणेशोत्सवानिमित्त जत्राही भरविण्यात येते. या जत्रेनिमित्त आकाश पाळणे, मेरी गो राउंड, मिठाई , खाद्य पदार्थ तसेच शोभिवंत वस्तूंची दुकानेही जत्रेत असतात. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचाही मंडळाचा प्रयत्न असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे.

यंदा स्टेशन पाडा ग्रामस्थ मंडळाच्या दत्त मंदिरात छोट्या मूर्तीची स्थापना करून दीड दिवसांचा माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता मिरवणूक न काढता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने विसर्जन केले जाईल. अशी माहिती मंडळाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र थोरात यांनी दिली आहे. भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली

First Published on: February 13, 2021 5:38 PM
Exit mobile version