धक्कादायक! शवदाहिनीतील गॅस संपला अन् मृतदेह अर्धवट जळाला; तिसऱ्या दिवशी केले अंत्यसंस्कार

धक्कादायक! शवदाहिनीतील गॅस संपला अन् मृतदेह अर्धवट जळाला; तिसऱ्या दिवशी केले अंत्यसंस्कार

शवदाहिनी

भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीमधील गॅस अचानक संपुष्टात आल्याने मृतदेहावर अर्धवट अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या संतापजनक प्रकारानंर भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीमधील गॅस तीन दिवसांनंतर भरल्यावर त्या मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत तो मृतदेह तेथेच पडून राहिल्याने कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

असा घडला प्रकार

भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीमध्ये शनिवारी रात्री एका मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला होता. नातेवाईकांना गॅस शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करायचे असल्याने मृतदेह गॅस शवदाहिनीत ठेवण्यात आला. शवदाहिनीचे यंत्र सुरु असताना ते अचानक बंद पडले, त्यावेळी गॅस पुरवठा बंद झाला असल्याचे कर्मचार्‍याच्या लक्षात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्यानंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन दिवस तो अर्धवट जळालेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता. दाहिनीला गॅस पुरवठा पुन्हा पुर्ववत करण्यात आल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहावर पुन्हा एकदा अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृतांचे नातेवाईक शवदाहिनी ऐवजी लाकडावरच अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देताना दिसतात. कोरोना दरम्यान, गॅस शवदाहिनीचा सर्वाधिक वापर केल्याचे समोर आले. त्यामुळे शवदाहिनीवर होत असलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. आता या घटनेची चौकशी करुन जबाबदार व्यक्तीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. स्मशानभूमीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


कोरोना महामारीत TB ने होणाऱ्या मृत्यूत १९२ पटीने वाढ

First Published on: September 9, 2021 8:58 AM
Exit mobile version