छत्रपती शिवाजी महाराज युगा युगांतरानंतर जन्म घेणारे पराक्रमी राजे- केडीएमसी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे

छत्रपती शिवाजी महाराज युगा युगांतरानंतर जन्म घेणारे पराक्रमी राजे- केडीएमसी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे

युगा युगांतरानंतर जन्म घेणारे पराक्रमी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी रविवारी काढले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दुर्गाडी किल्ल्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर महापालिका आयुक्त यांच्या दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस आणि अर्ध पुतळ्यास तसेच मुख्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, उपायुक्त स्वाती देशपांडे, अतुल पाटील, धैर्यशील जाधव, विनय कुलकर्णी, प्रशासन अधिकारी विजय सरकटे, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, घनश्याम नवांगुळ, रोहिणी लोकरे शैलेश कुलकर्णी, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त राजेश सावंत, हेमा मुंबरकर, संजयकुमार कुमावत, सुरक्षा अधिकारी जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. डोंबिवलीतही 6 फ प्रभागाचे सहा.आयुक्त भरत पाटील यांनी मानपाडा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

First Published on: February 19, 2023 10:02 PM
Exit mobile version