कोपरीत काही भागात दुषित पाण्याच्या पुरवठा

कोपरीत काही भागात दुषित पाण्याच्या पुरवठा

कोपरीत मंगळवारी सांयकाळी पाण्याची जलवाहिनी फुटली. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर बुधवारी सकाळी कोपरीकर नागरिकांना पाणी पुरवठा सुरू झाला. मात्र, कोपरीतील काही भागाला दूषित पाणी पुरवठा झाल्याने नागरिक हैराण झाले. त्यातच कोपरी हा परिसर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पांचपाखाडी मतदार संघात येत असल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

 ती जलवाहिनी बांधकाम प्रकल्पाच्या कामामुळेच पुन्हा जलवाहिनी फुटल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर, पालिकेकडून मात्र बांधकाम प्रकल्पाच्या कामामुळे जलवाहिनी फुटलेली नसल्याचा दावा करण्यात आला . संरक्षक भिंतीजवळील कामामुळे जलवाहिनीवरील माती निघून गेली होती. या जलवाहिनीच्या सांध्याजवळ पाण्याची गळती होत होती. त्याची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु पाणी पुरवठा सुरू होताच त्याच्या दाबामुळे जलवाहिनी सांध्यातून निखळली, असा दावा महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पालव यांनी केला. तर जलवाहिनी फुटल्यानंतर त्यात माती शिरल्यामुळे काही भागात दुषित पाण्याचा पुरवठा होत असावा, अशी शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
First Published on: May 17, 2023 10:20 PM
Exit mobile version