कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळून आले होते. कोरोनाची दुसरी लाट जुलै पासून ओसरायला सुरुवात झाली ती डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्णपणे ओसरली असल्याचे चित्र होते. मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात होवून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या आठ दिवसात कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे तब्बल ५ हजार पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरदिवशी कालच्यापेक्षा दुप्पटीने कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील रुग्ण संख्या लक्षात घेता व इतर शहरांची तुलना करता पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकट्या कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक कोरोनाबाधित  रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू दर २ टक्क्यांच्या आत होता. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली . त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक झाली.

डिसेंबर २०२१ मध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली. डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण संख्या प्रतिदिन १० ते ३५ दरम्यान होती. मात्र त्यानंतर डिसेंबर अखेरीस रुग्ण संख्या ११७ पार गेली. नवीन वर्षाची सुरुवात होताच दरदिवशी कालच्यापेक्षा दुप्पटीने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पहिल्या आठ दिवसात तब्बल ५ हजार ५१ रुग्ण सापडल्याने कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे.

First Published on: January 10, 2022 4:59 PM
Exit mobile version