कोरोना, बालरोग, अतिदक्षता विभाग कार्यान्वित, आरोग्य विभागासाठी डॉ शिंदे यांचा सव्वा कोटींचा खासदार निधी

कोरोना, बालरोग, अतिदक्षता विभाग कार्यान्वित, आरोग्य विभागासाठी डॉ शिंदे यांचा सव्वा कोटींचा खासदार निधी

कल्याण डोंबिवली महापालिकेस कायमस्वरुपी बालरोग विभाग असलेले रुग्णालय मिळेल आणि याचा फायदा जवळील शहरातील आणि गाव खेड्यांमधील लहान बालकांना देखील होईल. या अनुषंगाने यासाठी लागणारा १ कोटी २५ लक्ष इतका निधी हा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या खासदार निधीतून देण्याकरता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. त्यावेळी  लवकरात लवकर तो निधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस सुपूर्त करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे बालरोग विभाग व अतिदक्षता विभाग कोरोनाची साथ संपल्यानंतरही केडीएमसीत हे रुग्णालय कार्यान्वित राहील. असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार केतकर यांच्यापाठोपाठ मोठ्याप्रमाणात खासदार निधी आरोग्य विभागाला देणारे खासदार शिंदे हे दुसरे खासदार ठरले आहेत.

 

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार देण्यात येत आहे. या लाटेत लहान मुले अधिक प्रमाणात बाधित होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा उभारण्यासाठी व ज्या मुलांना गहन वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते, त्यांना समर्पित नवजात आईसीयू घटकांमध्ये ठेवले जाते. यापैकी प्रत्येक एनआयसीयू युनिट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुसज्ज असे बालरोग विभाग तसेच एनआयसीयु आणि बालरोग गहन काळजी युनिट असणे अत्यंत गरजेचे असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. जेणेकरून लहान बालकांना त्वरित उपचार घेता येऊ शकतो.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली येथे अशा प्रकारचे सुसज्ज असे पेडिएट्रिक युनिट निर्माण करण्याची आवश्यकता आहे, ज्यामध्ये ४० ते ५० खाटांचा बालरोग विभाग आणि १० खाटांचा नवजात अतिदक्षता विभाग तसेच १० खाटांचा बालरोग अतिदक्षता विभाग आणि १० बालरोग वेंटिलेटर,  बालरोग उपकरणे, प्राणवायू वाहिन्या यांचा समावेश असेल. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, केडीएमसी महापौर विनिता राणे, नगरसेवक राजेश मोरे, विश्वनाथ राणे आणि राजेश कदम, राहुल लोंढे आदी उपस्थित होते. आपलं महानगर या दैनिकाच्या ‘वेध परिसर’ या सदरातील लेखात १२ मे रोजी ठाणे जिल्ह्यात “सक्षम आरोग्य व्यवस्थेसाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार आवश्यक” या शीर्षकाखाली लेखन छापून आले होते. या लेखात आरोग्य व्यवस्थेतील आवश्यक वैद्यकीय सुविधांची गरज स्पष्ट करण्यात आली होती. त्यानंतर खासदार डॉ शिंदे यांनी पुढाकार घेत तब्बल १.२५ कोटींचा खासदार निधी आरोग्य व्यवस्थेसाठी दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

First Published on: May 24, 2021 8:47 PM
Exit mobile version