ठाण्यात नेमकं काय सुरु आहे? कार्पोरेटमधील अधिकाऱ्याला सेक्सटॉर्शन प्रकरणात लाखोंचा गंडा

ठाण्यात नेमकं काय सुरु आहे? कार्पोरेटमधील अधिकाऱ्याला सेक्सटॉर्शन प्रकरणात लाखोंचा गंडा

ठाण्यात उघडकीस आलेल्या एका गुन्हेगारीच्या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे. ठाणे शहरातील एका इसमाला महिलेने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसात ठाण्यामध्ये गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. याबाबतची माहिती अनेकदा समोर आलेली आहे. परंतु, Corporate officer is accused of lakhs of rupees in a sextortion case PPK सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्यानंतर या महिलेने सदर इसमाकडून तब्बल साडेसहा लाख रुपये देखील घेतले असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली येथे एका व्यक्तीला एका नंबरवरून व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल आलेला होता. त्यानंतर या व्हिडिओ कॉलवर या महिलेने त्याच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. याचवेळी या महिलेने या इसमासमोर कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर घाबरून या इसमाने फोन कट केला. परंतु काही वेळानंतर या महिलेने या व्यक्तीला एक व्हिडिओ आणि त्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले. ज्यामध्ये पीडित व्यक्ती हा त्या महिलेसोबत बोलत असल्याचे दिसून येत आहे.

परंतु हे सगळे पाहता सदर इसमाने लागलीच हे व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट आपल्या फोनवरून डिलीट करून टाकले. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सदर इसमाला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला आणि हा फोन दिल्ली पोलीस आयुक्त यांचा असल्याचे सांगण्यात त्याला आले. तुम्हाला कॉल केलेली महिला ही देहव्यापार करते आणि आम्ही त्या महिलेला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचदरम्यान तुमचा व्हिडिओ कॉल आम्हाला मिळाला जो सोशल मीडियात अपलोड होणार होता, असा बनाव रचून पीडित इसमाला जाळ्यात ओढण्यात आले.

त्यानंतर, फोन करणाऱ्या व्यक्तीने पीडित व्यक्तीला सांगितले की, हा तुमचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही देत असलेल्या क्रमांकावर तात्काळ संपर्क करा. त्यानंतर पीडित व्यक्तीने त्याला देण्यात आलेल्या क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी समोरील व्यक्तीने कथितपणे पीडित व्यक्तीकडे 50 हजार रुपयांची मागणी केली आणि पीडित व्यक्तीने आपली बदनामी होईल या भीतीने तात्काळ पैसे देऊ केले.

त्यानंतर 18 ते 25 मार्च दरम्यान पीडित व्यक्तीला वेगवेगळ्या व्यक्तींचा फोन आला. ज्यानंतर पीडित व्यक्तीने घाबरून त्याची बदनामी होऊ नये या विचाराने साडेसहा लाख रुपये त्यांना देऊ केले. यानंतर मंगळवारी पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे 10 जणांच्या विरोधात आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: May 31, 2023 9:49 PM
Exit mobile version