काताळात गडप झालेल्या पाण्याच्या टाकीचा शोध

काताळात गडप झालेल्या पाण्याच्या टाकीचा शोध

शिवदुर्ग प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धक संस्थेने ९ जानेवारी २०२२ रोजी माहुली गडावरील कल्याण दरवाजा आणि परिसर संवर्धन मोहीम आखली होती. या मोहीमेत कल्याण दरवाज्यात ज्या पाण्याच्या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. भविष्यात ज्या पाण्याचा प्रवाहामुळे संपूर्ण दरवाज्याचेच अस्तित्वास धोका निर्माण होण्याची शक्यता होती त्या पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी आणि दरवाज्याचा परिसर संवर्धन साठी खोदत असताना अचानक त्यांना काताळात गायब झालेली पाण्याची टाकी आढळून आली. त्यामुळे  इतिहासकारांना अभ्यासासाठी संधी असल्याचे प्रतिष्ठानचे म्हणणे आहे.

शिवदुर्ग प्रतिष्ठान नेहमी गड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आणि संवर्धन अशी कामे करत असते. यासाठी शिवदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेचे स्थानिक सहकारी अतुल कापटे-माहुली यांच्या मदतीने संस्थेचे प्रथमेश प्रकाश चव्हाण, आनंद जाधव, प्रवीण झेंडे, मयुर जाधव, सूरज साळवी, प्रशांत शिवाजी गिते, संजय माने, प्रेम विमल प्रकाश महाले- वसई ,सिद्धार्थ सुमन गुलाबराव बाविस्कर – वसई, समीर उल्हास भोईर ( कल्याण ),सिध्देश जाधव यांनी शहापूर तालुक्यातील वासिंद जवळील माहुली किल्ल्यावर पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी आणि दरवाजाचे संवर्धन करण्यासाठी मोहीम राबवली.

संस्थेचे प्रथमेश चव्हाण व सर्व सहभागी सदस्य यांच्या मते हे पाण्याचे टाके हे कल्याण दरवाज्यातून येणारे जाणारे आणि कल्याण दरवाज्यात पहारे नियुक्त सैन्य यांचेसाठी पाण्याची तजवीज म्हणून आहे. टाक्याचे आकारमान साधारण ७ फुट आडवे १० फुट उभे व समोरील बाजूस ३ फुट खोल आणि काताळाखाली दिड फुट असे आढळले.या मोहीमेची सुरुवात सकाळी ८ ते संध्याकाळी ४ शा ८ तासाची गड संवर्धन मोहीम पूर्ण केली.

First Published on: January 12, 2022 6:41 PM
Exit mobile version