ठाण्यात ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुरू; १०० जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस

ठाण्यात ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुरू; १०० जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस

ठाण्यात ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुरू; १०० जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस

ठाण्यात विविनाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ सुविधेतंर्गत महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी लसीकरणाचा दुसरा डस देण्यात आला. लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुविधा सुरू करण्याच्या सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी पुढाकार घेवून विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुविधा सुरू केली. महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेविका आशा डोंगरे उपस्थित होत्या. या सुविधेत रोज नोंदणीकरण केलेल्या १०० ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे.

हे लसीकरण दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात येणार आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून फक्त दुसऱ्या डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. सदरच्या केंद्रावर नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात येणार असून पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये. असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

First Published on: May 13, 2021 8:37 PM
Exit mobile version