एकलव्य क्रीडा मंडळाचा अनोखा उपक्रम; पक्ष्यांना पाणी आणि धान्यखाद्याची सोय

एकलव्य क्रीडा मंडळाचा अनोखा उपक्रम; पक्ष्यांना पाणी आणि धान्यखाद्याची सोय

एकलव्य क्रीडा मंडळाचा अनोखा उपक्रम; पक्ष्यांना पाणी आणि धान्यखाद्याची सोय

एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने व युवासेना समन्वयक किशोर म्हात्रे यांच्या पुढाकाराने ठाणे येऊर येथे पक्ष्यांना पाणी व दाणे यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. एप्रिल व मे असे दोन महिने मोठया प्रमाणात उष्णता वाढत असते. या कालावधीत पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असते. त्यामुळे ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. दोन महिने ही मोहीम चालू राहणार असुन. वाढती उष्णता लक्ष्यात घेता पक्ष्यांना पाणी आणि धान्यखाद्य याची उणीव भासु नये याकरीता येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी व मुलांनी ही मोहीम हाती घेतली आहे.उष्माघात म्हणजेच सुर्यघात. ही जीवघेणी अवस्था आहे ज्यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील ऊष्णता- संतूलन संस्था नाकाम होते.

वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधिंमुळे शरीर ते सहन करु शकत नाही ,वन्य प्राणी तसेच पशु पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे. कितीही उन्हाळा असला तरी मनुष्य स्वत:साठी पाण्याची सोय करू शकतो.वन्य पशु पक्ष्यांना पाणवठे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. यामुळे ते शहराकडे धाव घेतात, त्यासाठी नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून वन्य पक्ष्यांनाही पाणी व निवारा, आसरा देण्यासाठी जलपात्र व घरटी , धान्य पाणी, सावलीच्या ठिकाणी बसविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन पक्षिप्रमींकडून करण्यात येत आहे.

येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी व मुलांनी जलपात्र लावून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पुढे ही मोहीम असीच चालू राहणार असून येत्या काही दिवसात १०० जलपात्र ठेवण्यात येणार आहेत. हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र राबविण्याची आज आवश्यकता आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात वन्य पशु पक्ष्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यांची चारा-पाण्याची सुविधा नागरिकांनी करणे गरजेचे आहे. असे एकलव्य क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व युवासेना समन्वयक किशोर म्हात्रे म्हणाले.

First Published on: April 4, 2021 5:12 PM
Exit mobile version