बदलापुरात भरले साहित्यिकांच्या ‘स्वभाव चित्राचे’ प्रदर्शन

बदलापुरात भरले साहित्यिकांच्या ‘स्वभाव चित्राचे’ प्रदर्शन
मराठी भाषा दिनानिमित्त बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये साहित्यिकांच्या स्वभाव चित्राचे प्रदर्शन आयोजित आले आहे. 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या, बदलापूर नगरपालिकेच्या हेंद्रेपाडा येथील आर्ट गॅलरीमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत बदलापूर शहरातील रसिकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
सुप्रसिद्ध चित्रकार आणि लेखक विजयराज बोधनकर यांनी रेखाटलेल्या साहित्यिकांच्या स्वभाव चित्रांचे प्रदर्शन या आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. चित्रकार विजयराज बोधनकर यांनी  मध्ये ९० साहित्यिकांची स्वभाव चित्रे रेखाटली होती. त्यातीलच काही साहित्यिकांची स्वभाव चित्रे या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. या प्रदर्शनाचा शहरातील चित्रकारांनी आणि चित्रप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन, बदलापूर आर्ट गॅलरीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक श्रीकांत जाधव यांनी केले आहे. १६ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता या चित्रपटाचे उद्घाटन करण्यात आले. स्वायत्त मराठी विद्यापीठ आणि बदलापूर शहरातील ग्रंथसखा वाचनालयाचे प्रमुख ज्येष्ठ लेखक श्याम जोशी यांच्या हस्ते या ‘स्वभाव चित्र’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ निवेदिका दिपाली केळकर, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक, माजी  नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, आणि बदलापूर आर्ट गॅलरीचे सदस्य उपस्थित होते.
First Published on: February 19, 2023 10:29 PM
Exit mobile version