‘त्या’ नगरसेवकांसह शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करा

‘त्या’ नगरसेवकांसह शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करा

कोरोनात झुंडीने ठाणे महापालिका मुख्यालयातील भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांच्या दालनात घुसून त्यांना जाब विचारणा शिवसेना नगरसेवकांसह १०० ते १५० शिवसैनिकांवर महापालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करावा अशा मागणी करता, भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी भेट घेतली. त्यावेळी येत्या चार दिवसात आयुक्तांनी त्या दिशेने पावले उचलली नाहीतर, आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा भाजपने दिला आहे. एकीकडे भाजपने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर नौपाडा पोलीस ठाण्यात त्या शिवसेना नगरसेवक आणि ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला असताना, आता महापालिकेने तक्रार दिल्यावर त्या नगरसेवकांसह शिवसैनिकांवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत नगरसेवकांसह शिवसैनिकांना घेराव घालणे चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे.

ठाणे शहरात अनावश्यक असलेले तीन पादचारी पूल उभारून १३ कोटी रुपयांची लूट केली जात असल्याच्या प्रकारावर भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या खर्चातून शिवसेनेकडून निवडणूक निधी जमा केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आणि १०० ते १५० शिवसैनिकांनी डुंबरे यांना त्यांच्या दालनामध्येच घेराव घालत जाब विचारला होता. त्यामुळे या नगरसेवकांनी कारवाई करण्यासाठी भाजपने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात त्यानुसार गुन्हा देखील दाखल झाला आहे.

परंतु पालिका आयुक्तांनी या संदर्भात अद्यापही कोणतीच भुमिका न घेतल्याने भाजपने मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन घडलेल्या प्रकारची माहिती त्यांनी दिली. तसेच कोरोना आपत्तीच्या काळात जे काही घडलेले आहे, त्यानुसार संबधींत शिवसेनेच्या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. परंतु ती पालिका आयुक्तांकडून अपेक्षित कारवाई झाली नाही किंवा काही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत, तर मात्र चार दिवसानंतर आयुक्तांच्या दालनाबाहेरच तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक नारायण पवार, अर्चना मणोरा, नम्रता कोळी, मिलिंद पाटणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –

रक्षकच भक्षक झाल्यास सामान्यांनी कुणाकडे पाहायचं, वाझे प्रकरणावर फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

First Published on: March 17, 2021 7:31 PM
Exit mobile version