शेवटी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार – भास्कर जाधव

शेवटी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार – भास्कर जाधव

केंद्रीय निवडणूक आयोगाने विश्वासघात तर केलेलाच आहे, तो राज्यघटनेचा केला , तो लोकशाहीचा केला , तो संविधानाचा केला आणि शिवसेनेचा सुद्धा त्यांनी विश्वासघात केला अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली. पुढे बोलताना,जाधव यांनी कुठल्याच न्यायालयामध्ये न्याय मिळणार नसेल तर आता शेवटचे न्यायालय म्हणून जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ. जनतेलाच त्या ठिकाणी सांगायचं की आता न्यायाधीश न्याय करणारा खर्‍या अर्थाने ईश्वर हा जनता जनार्दना म्हणून तूच आहेस, तूच न्याय कर असेही ते म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना भाजपावर ही निशाणा साधला. ठाण्याच्या गडकरी रंगायतन रविवारी शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत जोते. याचदरम्यान, त्यांनी बोलताना, देशाच्या यापूर्वीच्या इतिहासात निवडणूक आयोगाने ओरिजिनल चिन्ह आणि नाव हे कुठल्याही गद्दार गटाला दिलेलं नाही ते गोठवण्याचं काम केलं पण देशाच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना घडली आहे अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या देशात शिवसेना म्हणजे ठाकरे धनुष्यबाण म्हणजे ठाकरे आहे हे बहुदा निवडणूक आयोगाला माहित नाही. असाही चिमटा त्यांनी काढत, भारतीय जनता पार्टीचे लोक जाहीरपणे सांगत होते, एकनाथ शिंदे यांना निशाणी मिळेल आणि शिवसेनेचे नाव मिळेल. तुम्ही आनंद साजरा करा जल्लोष साजरा करा हे अगोदर भाजपचे लोक सांगत होते असे बोलून त्यांनी भाजपा लक्ष करताना, कदाचित सही शिक्का हा निवडणूक आयोगाचा असेल निवडणूक आयोगाचा निकाल कुठल्यातरी पक्षाच्या कार्यातून लिहून आला होता आणि फक्त निवडणूक आयोगाला तो दयावयचा होता. असे ही म्हणून भाजपावर जोरदार टीका केली. पुढे बोलताना, जाधव यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुखांच्या खोलीतील देव्हार्‍यातील धनुष्यबाण हा देवाप्रमाणे पूजला जातो. तो शिवसेनाप्रमुखांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पूजेला तसाच ठेवला आहे असे सांगितले. पुढे बोलताना, जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना, बाळासाहेबांचे विचार तुम्ही पुढे घेऊन जात नाही, ज्याची नेमणूक बाळासाहेबांनी केली त्याला तुम्ही खाली ओढताय. बाळासाहेबांच्या दिलेल्या विचारांची आणि घेतलेला निर्णय सहित विश्वासघात केला. त्यामुळे तुम्ही प्रामाणिक नाही तर तुम्ही विश्वासघातकी आहेत. असे म्हटले.
आनंद आश्रमातील काम कसे चालते हे पाहण्यासाठी दिवंगत आनंद दिघे यांच्यासोबत 15 दिवस राहिल्याची आठवण सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नाहीतर शिवसेनेत असताना असलेल्या केसेसाठी न्यायालयात गेलो असे सांगितले. तसेच शिवसेनेत पुन्हा आल्यावर आणखी काही केसेस दाखल झाल्या आहेत असेही ते म्हटले.

उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा
येत्या 5 तारखेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड मध्ये जाहीर सभा होणार आहे. अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. तसेच यासभेला येण्याचे आमंत्रण ही त्यांनी यावेळी उपस्थित निष्ठावंत शिवसैनिकांना दिले.

दिल्लीत अफजलखान बसलाय-अरविंद सावंत

बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य, तुम्ही लढाऊ झाले नाही तरी चालले, पण विकाऊ होऊ नका. विकाऊ झाला तर मोग्याम्बोचा चेला व्हावे लागले. तो मोग्याम्बो हल्ली भलताच आनंदी आहे. त्याला माहिती नाही त्याने कोणाला छेडले आहे. हा आनंद चार दिवसांचा आहे. ही मशाल आतून ही धगधगत आहे. तसेच दिल्लीत अफजलखान बसला आहे. अशी टीका टिप्पणी नाव न घेता, भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार अरविंद सावंत यांनी ठाण्यात शिवगर्जना यात्रेत रविवारी केली.

खासदार सावंत यांनी बोलताना, राज्यात एका शेतकर्‍याच्या 512 किलो कांद्याला 2 रुपये भाव दिले गेले असे हे 2 रुपये भाव देणारे सरकार… तुमच्या गॅस सिलिंडरचे भाव गगनाला मिळवणारे सरकार… खोटे बोलणारे सरकार…भ्रष्टाचारी सरकार अशी टीका करताना, सावंत यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य काढले, ते त्यांना कसे जीवाशी आले आणि येथून ते गेले. ते जसे गेले तसेच हे मिंधे सरकारही जाईल अशी भविष्यवाणी खासदार सावंत यांनी केली. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे झालेल्या शिवगर्जना यात्रेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ही भविष्यवाणी केली. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार राजन विचारे, आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख केदार दिघे,संपर्क प्रमुख मधुकर देशमुख आदी उपस्थित होते. भाषणाची सुरुवातच खासदार सावंत यांनी नुसते हात वर नका करू ते चालवा असे बोलत केले. हे कोणाला घाबरून तिकडे गेले तर ते ईडीला घाबरून गेले, अशी टिका सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता केली. त्या परमारची डायरी उघडा बरे, त्या डायरीत कोणाचे नाव होते. असा सवाल उपस्थिताना सावंत यांनी केला. यावेळी सावंत यांनी निवडणूक आयोगावरही टिका केली. तसेच पीएम केअर फंडाबद्दल ही आपण आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: February 26, 2023 9:25 PM
Exit mobile version