कल्याणात अंधश्रद्धेला मूठमाती

कल्याणात अंधश्रद्धेला मूठमाती

भूत भुताटकी, चेटूक, काळी जादू, करणी, भानामतीच्या समाजात पसरलेल्या भ्रामक कल्पना आणि अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी कल्याण जवळील मोहने येथील उल्हास नदी जवळच्या स्मशानभूमीत रात्रीच्या सुमारास गौतम मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्मशानातच केक कापण्यात आला. यावेळी पाहुण्यांना जेवण केल्याने काल्पनीक भुताखेतांच्या भीतीवर मात करण्यात आली. १९ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला.
शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान गौतम मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक हिला लहान मुले मुली स्मशानभूमीत आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

या अनोख्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने अनिसचे डीजे वाघमारे, अविंधा वाघमारे, आनंद सोनवणे, संदीप शेंडगे, जीएम राजगुरू, सचिन बोराडे, राजेश मोरे ,अस्तिक राजगुरू, रामनाथ गायकवाड, उषा भोईर ,कृष्णा ताई गायकवाड, सुशील भडांगे, राहुल सावंत, सुनीता शेंडगे, अश्विन गाडे यांच्यासह लहान मुले विद्यार्थी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

First Published on: November 21, 2022 10:40 PM
Exit mobile version