ठाण्यातील गृहासंकुलांनाही मिळणार आता विकासकामांसाठी आमदारनिधी

ठाणे शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी आता लहान-मोठ्या गृहसंकुलांनाही मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून नुकताच याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.ठाणे शहरात सुमारे सहा हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. जिल्ह्यात ३४ हजार तर राज्यात एक लाख २२ हजार सोसायट्या आहेत. ठाणे शहरात असलेल्या सोसायट्या बहुतांशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून तेथे राहणाऱ्या रहिवाशांची संख्या मोठी आहे. तर काही गृहसंकुले अवाढव्य आहेत. या सोसायट्यांना आता अंतर्गत विकासकामांसाठी आमदार निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार संजय केळकर यांनी गेली चार वर्षे याबाबत पत्रव्यवहार करून या तरतूदीची गरज स्पष्ट केली होती. अधिवेशनातही त्यांनी सभागृहाचे लक्ष याकडे वेधून याचे गांभीर्य राज्य शासनाच्या दृष्टीस आणून दिले होते. या पाठपुराव्याला यश आले असून अर्थ विभागाने गृहसंकुलांना आमदारनिधी देण्यास हरकत नसल्याबाबतचा अध्यादेश २२ जून रोजी प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे ठाणे शहरासह जिल्हा आणि राज्यातील लहान-मोठ्या गृहसंकुलांना दिलासा मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. तर, या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून सोसायट्यांमधील लाखो रहिवाशांनी आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्यावतीने आमदार संजय केळकर यांचे आभार मानण्यात येत आहेत.

शहरातील सहा हजार गृहसंकुलांमधील हजारो फायदा

लहान गृहसंकुलांना आर्थिक चणचणीमुळे अनेक समस्या भेडसावत असतात. येथील पायवाट, मलनिस्सारण, आसन व्यवस्था आदी सोयी-सुविधा सक्षमपणे निर्माण करता येत नाहीत. आमदार निधी मिळाल्याने ही विकास कामे होऊन रहिवाशांची समस्यांतून सुटका होणार आहे. मोठ्या गृहसंकुलांमध्येही अंतर्गत रस्ते आणि इतर सोयी-सुविधा देण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. या निर्णयाचा फायदा ठाणे शहरातील सहा हजार गृहसंकुलांमधील हजारो नागरिकांना होणार आहे.

ठाणेशहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी आता लहान-मोठ्या गृहसंकुलांनाही मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून नुकताच याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. ठाणे शहरात सुमारे सहा हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. जिल्ह्यात ३४ हजार तर राज्यात एक लाख २२ हजार सोसायट्या आहेत. ठाणे शहरात असलेल्या सोसायट्या बहुतांशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून तेथे राहणाऱ्या रहिवाशांची संख्या मोठी आहे. तर काही गृहसंकुले अवाढव्य आहेत. या सोसायट्यांना आता अंतर्गत विकासकामांसाठी आमदार निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार संजय केळकर यांनी गेली चार वर्षे याबाबत पत्रव्यवहार करून या तरतूदीची गरज स्पष्ट केली होती. अधिवेशनातही त्यांनी सभागृहाचे लक्ष याकडे वेधून याचे गांभीर्य राज्य शासनाच्या दृष्टीस आणून दिले होते. या पाठपुराव्याला यश आले असून अर्थ विभागाने गृहसंकुलांना आमदारनिधी देण्यास हरकत नसल्याबाबतचा अध्यादेश २२ जून रोजी प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे ठाणे शहरासह जिल्हा आणि राज्यातील लहान-मोठ्या गृहसंकुलांना दिलासा मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. तर, या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून सोसायट्यांमधील लाखो रहिवाशांनी आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्यावतीने आमदार संजय केळकर यांचे आभार मानण्यात येत आहेत.

 शहरातील सहा हजार गृहसंकुलांमधील हजारो फायदा

लहान गृहसंकुलांना आर्थिक चणचणीमुळे अनेक समस्या भेडसावत असतात. येथील पायवाट, मलनिस्सारण, आसन व्यवस्था आदी सोयी-सुविधा सक्षमपणे निर्माण करता येत नाहीत. आमदार निधी मिळाल्याने ही विकास कामे होऊन रहिवाशांची समस्यांतून सुटका होणार आहे. मोठ्या गृहसंकुलांमध्येही अंतर्गत रस्ते आणि इतर सोयी-सुविधा देण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. या निर्णयाचा फायदा ठाणे शहरातील सहा हजार गृहसंकुलांमधील हजारो नागरिकांना होणार आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर आता भाजप ताकही फुंकून पितेय, आमदारांनी बाळगले मौन

First Published on: June 24, 2022 3:45 PM
Exit mobile version