गृहनिर्माण सोसायटी, इमारतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

गृहनिर्माण सोसायटी, इमारतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी
 ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून कोव्हिड १९ चा वाढता प्रार्दुभाव पाहता रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून या रुग्णांपैकी जास्तीचे रुग्ण हे मोठ्या गृहनिर्माण सोसायटी आणि इमारतीमध्ये असल्याचे दिसून आल्याने संसर्ग नियंत्रणासाठी इमारतींमध्ये करावयाच्या उपाययोजनांकरता महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांनी या सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश  म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींमध्ये कोविड  १९ सक्रिय रुग्ण आढळल्यास गृहनिर्माण सोसायट्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या कोविड १९ सक्रिय रुग्णांस देखभाल करण्यासाठी सेवा देणारी व्यक्ती संपूर्ण कोव्हिड लसीकरण घेऊन संरक्षित असलेबाबतची खात्री करुन या व्यक्तींशी दैनदिन संपर्क ठेऊन, गृहसंकुलातील व्यवस्थापकीय समितीने सहकार्य करावे. या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांस व त्यांच्या कुटूंबियांना दैनंदिन मूलभूत सुविधा पुरविणेबाबत सदर संकुलातील व्यवस्थापकीय समितीने योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

First Published on: January 10, 2022 5:10 PM
Exit mobile version