आदिवासी विकास मंडळाने हमीभावाने खरेदी केला शेकडो क्विंटल भात

आदिवासी विकास मंडळाने हमीभावाने खरेदी केला शेकडो क्विंटल भात

गेले अनेक वर्षे अदिवासी विकास मंडळाची हमीभाव भात खरेदी वेळेवर सुरू होतच नसे. परंतु या वर्षाला आघाडी सरकार शेतक-यांसोबत असल्याचे कृतीतून दाखवून दिल्याचे मुरबाडच्या हजारो भूमीपुत्रांच्या भाताला वेळेवर हमीभाव मिळाल्याने आदिवासींसह स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सवे सामान्या पेक्षा शेतक-यांना अत्यंत कठिणकाळ हा मागील २०२० ची कोरोना महामारी ठरली होती. सर्वत्र कोंडी होत असता एकमेव पर्याय ठरलेले भातपिक ज्यावर प्रापंचिक गरजा भागवणे, बँकेचे हप्ते, घरातील मंगलकार्ये उरकताना हा भाताचा एकमेव आधार असे. हे भातपिक विकत घेणारे अदिवासी विकास महामंडळ वेळेवर भात खरेदी काटा लावीत नसल्याने नाईलाजास्तव शेतक-यांना आपला भात खासगी व्यापा-यांच्या घशात घालावे लागत होते.

मात्र या वर्षी लवकरच अदिवासी विकास मंंडळाने हमीभाव खरेदी सुरू केल्याने शेतक-यांना या खरेदीमुळे योग्य मोबदला मिळून आला आहे. डोंगराळ दुर्गम भागात मोडणा-या दूधनोली, माळ या दोन अदिवासी विकास मंडळाच्या भातखरेदी केंद्रावर भात खरेदी सुरूच असल्याने या परिसरातील ३५ गाव २० वाड्यापाड्यांंवरील एकट्या दुधनोली काट्यावर हमीभाव १८६५ ने २६९२५ हजार क्विंंटल खरेदी पोटी ४५० शेतक-यांना online रक्कम २ कोटी २२ लाख जमा झालेत. तर माळ खरेदी केंंद्रावरील ५० गाव ८० वाड्यावरील १९ हजार ७०० क्विंटल भात खरेदीत ९८ लाख ६४ हजार रुपये शेतक-यांच्या खात्यावर थेट जमा झाले आहेत. वेळेवर भात खरेदी सुरू होताच हमी भाव मिळून खाजगी व्यापा-यांंकडील लूट थांबली. तर हमी भावासोबत मिळणारा ६०० रु बोनस देखील फाटक्या संसाराला हातभार लागणार आहे. परंतु या वर्षाला प्रथमच अदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी शेतक-यांना दिलासा दायक ठरली आहे.

First Published on: February 28, 2021 9:20 PM
Exit mobile version