कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
महावितरणच्या कल्याण परिमंडलात बुधवारी (८ मार्च) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते सर्व महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नगररचना विभागाच्या सहायक संचालक दिशा सावंत‍ आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सुजाता अंगडी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना सहव्यवस्थापकीय संचालक श्री. डांगे म्हणाले, सध्याच्या काळात अधिक वेगाने बदल होत आहेत. परंतू सामाजिक बदलांच्या तुलनेत महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदललेली नाही. ही मानसिकता सकारात्मक पद्धतीने व झपाट्याने बदलण्याची आवश्यकता आहे. महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. यातून लिंग समानतेचे लक्ष्य लवकर साध्य होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मुख्य अभियंता औंढेकर, सहायक संचालक श्रीमती सावंत आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंगडी यांनी विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासंबंधी आपल्या मार्गदर्शनात भाष्य केले.
यावेळी कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उप महाव्यवस्थापक श्रीमती सायली झवेरी, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, कार्यकारी अभियंते, अधिकारी व ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांनी केले. तर सहायक लेखापाल रेवती धादवड यांनी आभार मानले.
First Published on: March 9, 2023 10:50 PM
Exit mobile version