घरपालघरVirar News: कारगिल नगरमधील चाळमाफियांनी पुन्हा डोके वर काढले

Virar News: कारगिल नगरमधील चाळमाफियांनी पुन्हा डोके वर काढले

Subscribe

नागरिकांच्या तक्रारींनंतर महापालिकेने या इमारतींना एमआरटीपीच्या नोटीसा बजावून संबंधित बांधकामधारकांना काम थांबवण्याचे आदेश दिलेले होते.

वसईः विरार पूर्वेकडील बहुचर्चित कारगिल नगरमधील चाळमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वसई-विरार महापालिकेने नोटीस बजावून ‘जैसे थेचे आदेश दिलेल्या अनेक बेकायदा इमारतींची कामे पुन्हा वेगात सुरू झाली आहेत. या इमारत बांधकामांना दर्जा नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही महापालिका याकडे लक्ष देत नसल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली आहे. महापालिका प्रभाग समिती ‘बअंतर्गत येणार्‍या कारगिल नगरमधील वॉर्ड क्रमांक-25, 26 व 28 या प्रभागांत मागील वर्षी अनेक अनधिकृत इमारतींची कामे सुरू होती. नागरिकांच्या तक्रारींनंतर महापालिकेने या इमारतींना एमआरटीपीच्या नोटीसा बजावून संबंधित बांधकामधारकांना काम थांबवण्याचे आदेश दिलेले होते.

महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनीही ‘अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्षाची स्थापना करून शहरात होणार्‍या अनधिकृत बांधकामांची माहिती महापालिका अभियंते व अधीक्षक आणि प्रभारी सहाय्यक आयुक्तांना घेण्याचे आदेश दिलेले होते. या काळात महापालिकेने अनेक अनधिकृत बांधकामांना नोटीसा काढल्या होत्या.कारगिल नगरमधील परिसरातील मनवेलपाडा गाव, स्मशानभूमी, कारगिलनगर-मानसी ज्वेलर्स गल्लीतील जय तुळजा भवानी संकुल तसेच प्रभाग-25 च्या माजी नगरसेविका यांच्या कार्यालयामागे होत असलेल्या अनेक अनधिकृत बांधकामांनाही महापालिकेने नोटीसा बजावलेल्या होत्या. यातील कारगिलनगर-मानसी ज्वेलर्स गल्लीतील जय तुळजा भवानी संकुल थेट वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेले आहे. तर मनवेलपाडा गाव-स्मशानभूमीच्या मागे असलेले गल्लीबोळांतही लहान-मोठ्या इमारतींची कामे छुप्या पद्धतीने; पण जोरात सुरू आहेत.

- Advertisement -

 

निवडणुकांचा गैरफायदा घेत आहेत चाळमाफिया

- Advertisement -

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्ताने लागलेल्या आचारसंहिते आड ही अनधिकृत बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. सध्या वसई-विरार महापालिकेचे अनेक अधिकारी निवडणुकीच्या कामांत व्यग्र आहेत. याचा गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामधारकांनी पुन्हा डोके वर काढले आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -