वाहनतळ बंद ठेवणे हे ठामपाचे पार्किंग धोरण आहे का ? काँग्रेसचा सवाल

वाहनतळ बंद ठेवणे हे ठामपाचे पार्किंग धोरण आहे का ? काँग्रेसचा सवाल

वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात असलेले गावदेवी मार्केट, गावदेवी मैदान, कुस्तीगीर भवन इमारतीच्या बाजूला असलेला वाहनतळ हे तिन्ही वाहनतळे बंद ठेवणे हे महानगरपालिकेचे पार्किंग धोरण आहे का असा सवाल ठाणे काँग्रेसने केला आहे. तसेच ते सुरू करण्यासाठी कोणाची वाट पाहता. ठाणेकर नागरिकांची गैरसोय सोडणे महत्वाचे की कोणासाठी ते बंद करून ठेवणे योग्य आहे. ठाणेकरांची गरज लक्षात घेऊन ते तातडीने सुरू करा अशी मागणीही काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. तर दररोज रेल्वेने प्रवास करणारे ठाणेकर घर ते रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीचा वापर करतात. पण स्टेशन परिसरात पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही. याशिवाय स्टेशन जवळील मुख्य बाजारपेठेत चारचाकी वाहन घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहेत. परंतु या वाहनांना देखील पार्किंगसाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. पार्किंग अभावी नागरिकांना टोविंग व्हॅन,नो पार्किंग दंडाचा मोठ्या प्रमाणात भुर्दंड पडत आहे. असेही पिंगळे यांनी निर्दशनास आणून दिले आहे. त्यामुळे ठाणेकरांची पार्किंग अभावी होणारी गैरसोय पाहता, ते बंद असलेले तीनही वाहनतळ खुले करण्याचा निर्णय तातडीने दहा दिवसात घ्या अशी मागणी राहुल पिंगळे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना पत्राद्वारे केली आहे.अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा दिला आहे.

First Published on: February 26, 2023 9:56 PM
Exit mobile version