जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचे ठाणे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन; पाठिंब्यासाठी मनसेचे अविनाश जाधव उपस्थित

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचे ठाणे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन; पाठिंब्यासाठी मनसेचे अविनाश जाधव उपस्थित

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचे ठाणे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन; पाठिंब्यासाठी मनसेचे अविनाश जाधव उपस्थित

राज्यासह ठाण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ठाण्यात ऑक्सिजन आणि रेमडीसिवरच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.याच मुद्द्यावरून आता राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड आणि ठामपा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात महापालिका मुख्यालयाच्या पायी बसून मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. या अंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते. नागरिकांना ऑक्सिजन आणि रेमडीसिवरचा पुरवठा करावा अशी मागणी केली. रिकामा ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन त्यांनी प्रशासनाचा कारभाराचा निषेध केला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त संदीप माळवी यांनी आंदोलनकर्त्यांनी समजूत काढण्यासाठी मध्यस्थी केली. त्यासाठी त्यांच्यावर पायरीवर बसण्याची वेळ ओढवली.

ठाणे महापालिका हद्दीत रेमडीसिवीर आणि ऑक्सिजनमुळे ठाण्यातील राजकीय वातारवण चांगलेच तापले आहे. ठाणे महापालीकेच्या कोविड रुग्णालयासोबतच खाजगी रुग्णालयामध्ये देखील ऑक्सिजन आणि रेमडीसिवीर उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरु असून प्रशासनाच्या या कारभाराचा निषेध करत सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड ,विरोधी पक्षनेते शानू पठाण, नगरसेवक सुहास देसाई, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका मुख्यालयातील पायरी बसून ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच ठाणेकरांवर ही वेळ आली असल्याचे आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. जोपर्यंत आयुक्त स्वतः येऊन यासंदर्भात काही माहिती देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

 

ठाणे महापालिकेचे उपयुक्त संदीप माळवी यांनी आंदोलन सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र ऋता आव्हाड आणि शानू पठाण हे आंदोलनच्या भूमिकेवर ठाम राहिले. ऑक्सिजन आणि रेडमीसिवीरचा पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून महाविकास आघाडीतच गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीलाच अशा प्रकारे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. गृहनिर्माण मंत्र्यांची पत्नी असले तरी मी अनेक सामाजिक संस्थाशी जोडले गेले असून सामान्य जनतेसाठी आंदोलन करणे हे माझे कर्तव्य असल्याचे ऋता आव्हाड यांनी सांगितले.

काही वेळानंतर आंदोलनात सहभागी झालेले मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची भेट घेतली. शहरात निर्माण झालेल्या परिस्थितिबाबत त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. तर खाली ऋता आव्हाड आणि शानू पठाण यांचे आंदोलन सुरूच होते. यावेळी अजून एक नाराजी नाट्य दिसून आले. या आंदोलनच्या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हे त्या ठिकाणी आले. स्वतः ऋता आव्हाड हे आंदोलनाला बसल्या असताना मुल्ला हे त्या ठिकाणी थांबतील अशी अपेक्षा होती. मात्र मनसेचे अविनाश जाधव यांना आंदोलनात पाहून जर मनसे असेल तर या आंदोलनात सहभागी होणार नाही असे स्पष्ट करत ते थेट तिथून निघून गेले.

 

हे ही वाचा – https://www.mymahanagar.com/thane/remdesivir-stocks-depleted-in-thane-an-increase-in-municipal-concern/282067/

 

First Published on: April 20, 2021 6:05 PM
Exit mobile version