KDMC :आरक्षित भूखंडाचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहीर लिलाव; मात्र प्रशासन मूग गिळून

KDMC :आरक्षित भूखंडाचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहीर लिलाव; मात्र प्रशासन मूग गिळून

कल्याण : कल्याण कृषी बाजार उत्पन्न समितीच्या आवारात असलेला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा आरक्षित भूखंड भाड्याने देण्याचा मनसुबा रचला गेला. यासंदर्भात पुढील आठवड्यात  जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याने मालकी नसलेल्या आरक्षित भूखंडाचा कृषी उत्पन्न बाजार समिती विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील खुली जागा कल्याण डोंबिवली महापालिकेने पोस्ट ऑफिस व पिकनिक स्पॉटसाठी आरक्षित ठेवली गेली आहे. भूखंडाच्या आरक्षित क्षेत्राचे 3338  चौ.मी. क्षेत्र आहे. भाडे कराराने कृषी उत्पन्न बाजार समिती हा भूखंड एका लिलावाद्वारे करणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला महिन्याला जास्तीत जास्त भाडे देणाऱ्यास भूखंड उपलब्ध करून देणार आहे. आरक्षित भूखंड महापालिका जोपर्यंत पोस्ट ऑफिस व पिकनिक स्पॉटसाठी संपादित करत नाही तोपर्यंतच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर देणेकरीता जाहिर लिलाव बुधवार, 27 तारखेस रोजी दुपारच्या सुमारास समितीच्या कार्यालयात उघड बोली पद्धतीने होणार आहे.

हेही वाचा – Mumbai : दिवसाढवळ्या मुंबईत 16 राऊंड फायर, 1 ठार, 5 जखमी; आरोपींचा शोध सुरू

या पद्धतीची जाहिरात वर्तमान पत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीने देऊन आपला मनसुबा जाहीर केला आहे. परंतु आरक्षण नियमावली नुसार ते बेकायदेशीर असल्याचे कल्याण डोंबिवली मनपा नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच या संर्दर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठलाही पत्र व्यवहार मनपाशी केला नसल्याचे सांगितले. शासनाची अंग असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या धोरणामुळे कल्याण डोंबिवली मनपाच्या आरक्षित भूखंडाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे येताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने ओपन टेरस देखील भाड्याने देण्याचा प्रस्ताव आणला असल्याने तो कायदेशीर आहे का? असा सवाल देखील यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

हेही वाचा – Sunil Kedar यांची आमदारकी रद्द; नाना पटोले यांनी भाजपावर साधला निशाणा

याबाबत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कानिक पाटील यांनी सांगितले की , या जागेबाबत लिलाव काढला असून ही जागा महापालिकेची आरक्षित आहे. जेव्हा पालिकेला ही जागा लागेल तेव्हा पालिकेला ही जागा देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: December 24, 2023 7:38 PM
Exit mobile version