घरमहाराष्ट्रSunil Kedar यांची आमदारकी रद्द; नाना पटोले यांनी भाजपावर साधला निशाणा

Sunil Kedar यांची आमदारकी रद्द; नाना पटोले यांनी भाजपावर साधला निशाणा

Subscribe

मुंबई : नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज (24 डिसेंबर) त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली होती. त्यासोबत न्यायालयाचे आदेश देखील पाठविले होते. या पार्श्वभूमीवर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (Sunil Kedar MLA canceled Nana Patole targeted BJP)

हेही वाचा – Sunil Kedar मायग्रेनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने ICUमध्ये उपचार

- Advertisement -

पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, मुझफरनगरचे विक्रम सैनी भाजपाचे आमदार आहेत. त्यांना न्यायलयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. सुनील केदार यांच्या प्रकरणामध्ये त्यांना खालच्या न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांना आता अपीलमध्ये जाण्याची संधी आहे. जसं भाजपाच्या खासदारांना आणि आमदारांना अपीलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र त्याचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी भाजपाने कधी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले म्हणाले की, आज रविवार असतानाही भाजपाने घाई केली आणि सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली. देशात भाजपामध्ये असलेले नेता गुजरातच्या वॉशिंगमध्ये धुतले जातात, अश्या पद्धतीची चर्चा त्यांचेच खासदार आणि आमदार करतात, माध्यमांनाही सांगतात. ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे, ती काही जास्त दिवसांची नाही. सत्तेचा गैरवापर करण्याची प्रथा जी भाजपाने सुरू केलेली आहे, त्यांच्या हा प्रकार आहे. परंतु सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Weather Update : मुंबईत थंडीचा कडाका वाढला; राज्यात कुठे कसे तापमान?

शिंदे आणि अजित पवार गटाचे लोकंही भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले

शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी वीज बिल वसूल करू नका, अशी प्रकारची अधिकाऱ्याला धमकी दिली आहे, या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे लोकं वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला काही केले, बंदुकीच्या गोळ्या कोणाला मुंबईत घातल्या, हवेत फायरिंग केली, तरी ते वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले आहेत. त्यामुळे त्यांना मोकळीक आहे. महाराष्ट्रात आज अराजकता भाजपा सरकारने निर्माण करून ठेवली आहे. त्यांचाच परिणाम हा आहे की, सत्ता पक्षामधले आमदार आणि मंत्री ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धमकवतात हे चित्र रोज पाहायला मिळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -