मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात

मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात
अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगडाच्या पायथ्यापासून ते फ्युनिकुलर ट्रेनपर्यंतच्या चार पदरी रस्त्याचे आणि गडावर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांच्या कामाचे अलीकडेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. यावेळी मलंगगडाचा सर्वांगिण विकास करण्याचे आश्वासन डॉ. शिंदे यांनी दिले.
हाजी मलंगवाडी ते फेनिक्युलर लोअर ट्रॉली स्टेशन पर्यंतचा चारपदरी रस्ता, बक्तारशाह बाबा दर्ग्यापासून श्रीमलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला घडीव दगडाच्या खांडकी पेव्हिंगच्या माध्यमातून पायऱ्या आणि त्याला सुरक्षा रेलिंग, आंबे गाव रस्त्यावर साकव आणि उसाटणे,बुर्दूल, नाऱ्हेण, पाली, चिरड,शेलारपाडा रस्त्या ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत.
लोकसभा २०१४ च्या निवडणुकीवेळी या भागात फिरताना या भागातील गरजा ओळखून घेतल्या होत्या. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता भाऊसाहेब दांगडे यांनी आवर्जून या भागाची माहिती घेत कामांना गती दिल्याचेही यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लवकरच या भागातील रस्त्यांची कामे पूर्ण होऊन इथला प्रवास सुखकर होईल, असेही डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील शाळांचे रूप लवकरच बदलवले जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, अब्दुल बाबाजी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, बांधकाम सभापती वंदना भांडे, सुवर्णा राऊत, श्याम बाबू पाटील, तेजश्री जाधव, सुरेश पाटील, अशोक म्हात्रे, बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.
First Published on: January 13, 2022 9:57 PM
Exit mobile version