सैनिकी विद्यालयातील विद्यार्थी बुडाला

सैनिकी विद्यालयातील विद्यार्थी बुडाला

उल्हास नदीच्या पाण्यातील पातळीचा पसरलेल्या जलपर्णीचा अंदाज न आल्याने आपल्या मित्रासमवेत पोहण्यास गेलेल्या मोहने येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असणार्‍या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. पोलीस व अग्निशामन दलाचे जवान त्याचा शोध घेत असून 24 तास उलटूनही त्याचा थांग पत्ता लागलेला नाही. मोहने जेतवन नगर येथे राहत असलेले बाळू भीमराव भालेराव यांचा एकुलता एक मुलगा पियुष (18) हा पुणे येथील सैनिकी विद्यालयामध्ये शिकत होता. त्याचे आई-वडील नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाला नाशिक येथे चालले होते. आई वडील नाशिकला जात असल्याने पियुष हा उल्हासनगर मधील आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. परिसरातील दोन मित्रासमवेत उल्हास नदीत दुपारच्या दरम्यान तो पोहण्यासाठी गेला असताना नदीच्या पात्रातील विस्तीर्ण पसरलेल्या जलपर्णीमुळे खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

पियुष पाण्यात बुडाल्याची खबर त्याच्या आई-वडिलांना लागताच ते घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात अग्निशमन दल तसेच पोलिसांनी त्याचे शोधकार्य रविवारपासून सुरू केले. मात्र 24 तास उलटूनही त्याचा थांग पत्ता अद्याप लागलेला नाही. पुण्यातील सैनिकी विद्यालयात पियुष शिकत असून भालेराव यांचा तो एकुलता एक मुलगा होता.

First Published on: March 20, 2023 10:08 PM
Exit mobile version