एमएमआरडीच्या घरात महाघोटाळा?

एमएमआरडीच्या घरात महाघोटाळा?

दिवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या एमएमआरडीएच्या घर घोटाळ्याच्या चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी ठाणे महापालिका मुख्यालसासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच या महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार महापालिका स्थावर मालमत्ता विभागाचे अधिक्षक महेश आहेर हेच असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर त्यांना पदावरून तात्काळ निलंबत करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली. जर ठाणे शहर पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केली नाहीतर त्यांची तक्रार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार असल्याचा इशाराही, परांजपे यांनी दिला.

ठाणे शहराध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते शानु पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर हे आंदोलन पुकारले आहे. यावेळी बोलताना, विरोधी पक्षनेते पठाण यांनी ठाणे महानगर पालिकेच्या वतीने बाधितांचे पुनर्वसन करताना घरे देण्यात आली आहेत. एमएमआरडीएने ठामपाकडे घरे वर्ग केली आहेत. त्यानुसार ठामपाने यादी तयार करून घरांचे वाटप करण्यात आले. सन २०१६ मधील रस्ता रुंदीकरणातील बाधितांना घरे दिली. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस बायोमेट्रिक सर्व्हे, संगणकीय चाव्या तयार करण्यात आल्या आहेत.

पालिका अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून दोषींचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी या भ्रष्टाचाराचा प्रमुख सूत्रधार स्थावर मालमत्ता विभागाचे प्रमुख महेश आहेर असल्याचा आरोप करीत त्यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली.

तर, ठामपा स्थावर मालमत्ता विभाग, प्रमुख महेश आहेर यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून त्यानुसार सदनिका कोणाच्या ताब्यात आहेत, त्याची माहिती घेण्यासाठी आमची चौकशी सुरू आहे.यामध्ये महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांच्या आणि माझी देखील चौकशी झालेली आहे.  येथील १८ सदनिकापैकी १४ महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. तर ४ सदनिकांच्या ठिकाणी बाधीतांना घरे देण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही स्वरुपाचा गैरव्यवहार झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: January 17, 2022 6:50 PM
Exit mobile version